Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठरले, 'या' चार देशांमध्ये होणार टायगर श्रॉफच्या बागी3 चे शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 16:54 IST

टायगर श्रॉफचा आगामी सिनेमा 'बागी 3'चे शूटिंग लवकरच सुरु होणार आहे. मेकर्सना हा सिनेमा आधीच्या दोन सीरिजपेक्षा मोठा बनवायचा आहे.

ठळक मुद्दे या सिनेमाचे शूटिंग एक दोन नाही तर तब्बल चार देशांमध्ये होणार आहेहा सिनेमा 6 मार्च 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टायगर श्रॉफचा आगामी सिनेमा 'बागी 3'चे शूटिंग लवकरच सुरु होणार आहे. मेकर्सना हा सिनेमा आधीच्या दोन सीरिजपेक्षा मोठा बनवायचा आहे. त्यामुळे या सिनेमाचे शूटिंग एक दोन नाही तर तब्बल चार देशांमध्ये होणार आहे. 

रिपोर्ट्नुसार निर्माता साजिद नाडियावाला आणि दिग्दर्शक अहमद खान सिनेमाच्या टीमसोबत चार देशांचे लोकेशन्स पाहण्यासाठी जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 15 दिवस मोरक्को, इजिप्त, सर्बिया आणि टर्कीमध्ये लोकशन्सचा शोध घेणार आहेत. हा सिनेमा 6 मार्च 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भागीच्या पहिल्या भागात टायगरसोबत श्रद्धा कपूर झळकली होती. तर दुसऱ्या भागात दिशा पटानी मात्र तिसऱ्या कोणाची वर्णी लागलीय ते अद्याप समजू शकलेले नाही. सारा अली खानला ही भूमिका ऑफर करण्यात आली होती मात्र साराने टायगरसोबत काम करण्यास नकार दिल्याचे समजतेय.  रिपोर्टनुसार, साराने सिनेमातील भूमिका बघून नकार दिला आहे. साराची यात फारशी मोठी भूमिका नव्हती. ती फक्त काही वेळासाठीच स्क्रिनवर होती, हे बघून साराने 'बागी3'साठी नकार दिल्याचे समजतेय. त्यामुळे आता या सिनेमात टायगरच्या अपोझिट कोणती अभिनेत्री दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 

'बागी 3' शिवाय टायगर 'स्टुडंट ऑफ द ईअर 2'मध्ये टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. त्याच्यासोबत तारा सुतारिया आणि अनन्या पांडे या दोघी या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहेत.    

टॅग्स :टायगर श्रॉफश्रद्धा कपूरदिशा पाटनी