Join us

टायगर म्हणतो,‘ मी ‘बाघी’ नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 22:33 IST

टायगर श्रॉफ सध्या ‘बाघी : रिबेल इन लव्ह’ चित्रपटासाठी शूटींग करण्यात व्यस्त आहे. तो जरी आगामी चित्रपटात बंड करत ...

टायगर श्रॉफ सध्या ‘बाघी : रिबेल इन लव्ह’ चित्रपटासाठी शूटींग करण्यात व्यस्त आहे. तो जरी आगामी चित्रपटात बंड करत असेल तरी तो म्हणतो की,‘माझे व्यक्तिमत्त्व ‘बाघी’ सारखे  नाही. मी अत्यंत शांत, सभ्य माणूस आहे. बाघी बनण्यात मला रस नाही. माझे वडील खुप कडक आहेत. मी माझ्या आईसमोर देखील कधीतरी रिबेल म्हणजेच बंड करू लागलो तरी ते मला रागावतात. पण ‘बाघी’ म्हणजे मी नाही, असे टायगर श्रॉफ सांगतो. एक उत्तम डान्सर आणि उत्कृष्ट जीमनॅस्ट म्हणून ओळखला जाणारा टायगर हा खुप शिस्तप्रिय आणि चांगल्या संस्कारातील व्यक्ती आहे. याउलट, बबली श्रद्धा कपूर म्हणते जेव्हा खाण्याची वेळ येते तेव्हा  ती बंड करते. मला चांगले जेवण किंवा खाद्य खुप आवडते.’ तिने ‘तेरी गलियाँ’ आणि ‘दो जहाँ’ हे दोन गाणे गायले आहेत.