Join us
Daily Top 2Weekly Top 5

टायगर म्हणतो,‘ मी होणार सुपरस्टार!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 12:24 IST

 टायगर श्रॉफ अजूनही ‘बागी’ च्या यशातून बाहेर पडला नाही. श्रद्धा कपूरसोबत त्याने चित्रपटात उत्तम केमिस्ट्री साकारली होती. हृतिक रोशनचा ...

 टायगर श्रॉफ अजूनही ‘बागी’ च्या यशातून बाहेर पडला नाही. श्रद्धा कपूरसोबत त्याने चित्रपटात उत्तम केमिस्ट्री साकारली होती. हृतिक रोशनचा खुप मोठा फॅन तो आहे. तो हृतिकच्या पाऊलावर पाऊल ठेवून बॉलीवूडमध्ये स्वत:चे वेगळे महत्त्व सिद्ध करू इच्छितो आहे.टायगर म्हणतो,‘ माझे नाव हृतिकच्या नावाशी जोडले जाते एवढेच माझ्यासाठी खुप आहे. मी त्याच्याप्रमाणे अ‍ॅक्टिंग करतो हे मी मुद्दामहून करत नाही. तर ते माझ्याकडून आपसूकच येते.तुम्ही जर ‘अ फ्लार्इंग जट ’ चे पोस्टर पाहिले तर लक्षात येईल की ते थोडेसे ‘क्रिश’ सारखेच दिसते. बॉडी लँग्वेज संपूर्णपणे हृतिकप्रमाणेच दिसते. मी देखील एकदिवस हृतिकसारखाच सुपरस्टार होणार.’