Join us

टायगर म्हणतोय ‘गर्ल आय नीड यू...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2016 08:50 IST

टायगर श्रॉफ-श्रद्धा कपूर यांचे नुकतेच रिलीज झालेले गाणे म्हणजे ‘छम छम’. त्या दोघांनी त्यांच्यासोबत त्यांच्या चाहत्यांना देखील पावसात चिंब भिजवले. 

टायगर श्रॉफ-श्रद्धा कपूर यांचे नुकतेच रिलीज झालेले गाणे म्हणजे ‘छम छम’. त्या दोघांनी त्यांच्यासोबत त्यांच्या चाहत्यांना देखील पावसात चिंब भिजवले. त्यानंतर चित्रपटाच्या टीमने अजून एक कुल साँग ‘गर्ल आय नीड यू...’ आऊट केले आहे.ते देखील नयनसुख देणारं आणि केरळच्या निसर्गसौंदर्याने संपन्न अशा वातावरणात शूट झालेले आहे. हे गाणे केरळातील सर्व पाण्याच्या तलावांच्या ठिकाणी शूट केलेले आहे. हे गाणे अर्जित सिंग, मीत ब्रॉस, रोच किला आणि खुशबू यांनी गायले आहे.टायगर-श्रद्धा हे एकमेकांसोबत इतके सुंदर दिसतील असे कधी वाटले होते का? नाही ना?  वेल, पण त्यांची केमिस्ट्री तरूणाईला नक्की आवडणार यात काही शंकाच नाही. जिथे श्रद्धा असते ना तिथे गर्दी आपोआप खेचली जाते.बाघी हा सब्बिर खान दिग्दर्शित चित्रपट असून २९ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे." >">http://