कॉफी डेटवर टायगर-दिशाच्या रंगतदार गप्पा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 15:55 IST
टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी हे सध्या रिलेशनशिप मध्ये असून त्यांचे ‘बेफिक्रा’ हे गाणे नुकतेच आऊट करण्यात आले आहे. ...
कॉफी डेटवर टायगर-दिशाच्या रंगतदार गप्पा!
टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी हे सध्या रिलेशनशिप मध्ये असून त्यांचे ‘बेफिक्रा’ हे गाणे नुकतेच आऊट करण्यात आले आहे. बॉलीवूडमधील हॉटेस्ट कपलपैकी एक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ते दोघे वांद्रे येथील कॅफे शॉप मध्ये एकत्र भेटलेले दिसले.दिशा यावेळी बॅकलेस जंपसुटमध्ये आली होती तर तो गुलाबी कलरच्या शर्टमध्ये आला होता. ते दोघेही डान्समुव्ह्जच्या संभाषणात एवढे बिझी होते की, त्यांना कळालेच नाही की ते खुपच क म्फर्टेबली सामान्य जोडप्याप्रमाणे तिथे गप्पा मारत बसले आहेत.कॉफीचा घोट घेत गप्पांना रंगत येत होती. कुणीही त्यांना या प्रकारे पाहिले असते तर ते सेलिब्रिटी नसून एक साधारण कपल असल्याचेच कुणालाही वाटले असते.