Join us

  तुम्हीही पाहा आणि हसा! ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे भन्नाट मीम्स व्हायरल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 14:20 IST

होय, आमिरचा चित्रपट फ्लॉपच्या यादीत जाणार अशी चिन्हे दिसताच, या चित्रपटावरचे मजेशीर मीम्स वा-यासारखे व्हायरल होत आहेत. 

अमिताभ बच्चन, आमिर खान, कॅटरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांची मुख्य भूमिका असलेला ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चा दिवाळी बॉम्ब फुस्स झाला.  हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर चांगलाच आपटला. आता अशास्थितीत सोशल मीडियावरच्या क्रिएटीव्हीटीला जोर चढणार नाही, असे शक्यचं नाही. होय, आमिरचा चित्रपट फ्लॉपच्या यादीत जाणार अशी चिन्हे दिसताच, या चित्रपटावरचे मजेशीर मीम्स वा-यासारखे व्हायरल होत आहेत. 

 चित्रपटाची ताणली गेलेली उत्सुकता आणि धमाकेदार प्रमोशन यामुळे ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. पहिल्या दिवशी या चित्रपटाने  ५२.२५ कोटींची कमाई केली. पण दुसºया दिवशीपासून या चित्रपटाच्या कमाईला ब्रेक लागला. चौथ्या दिवशी तर ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ला फारचं कमी पे्रक्षक लाभले. चौथ्या दिवशी या चित्रपटाने केवळ १६ कोटी बिझनेस केला. आमिर खानच्या या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी या चित्रपटाकडून आमिरसकट सगळ्यांनाच प्रचंड अपेक्षा होत्या. पण चौथ्या दिवशीचे चित्रपटाचे प्रदर्शन कमालीचे निराशाजनक राहिले. त्यामुळे हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर आठवडा काढतो की नाही, अशीही शंका व्यक्त केली जात आहे. तूर्तास दिवाळीचा बॉम्ब फुस्स निघाला, असे ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’बद्दल बोलले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. तुम्हीही बघा आणि पोटभर हसा...!!

 

टॅग्स :ठग्स आॅफ हिंदोस्तान