Join us

​ थ्रील, सस्पेन्स, लव्ह, रोमान्सचे कॉकटेल आहे ‘३ स्टोरीज्’ चा ट्रेलर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 13:24 IST

‘३ स्टोरीज’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. हा ट्रेलर अतिशय रोमांचक आहे. थ्रील, सस्पेन्स, लव्ह, रोमान्स अशा सगळ्यांचे मिश्रण असलेल्या ट्रेलरमध्ये वेगवेगळ्या पात्रांच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला दिसतात.

‘३ स्टोरीज’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. हा ट्रेलर अतिशय रोमांचक आहे. थ्रील, सस्पेन्स, लव्ह, रोमान्स अशा सगळ्यांचे मिश्रण असलेल्या ट्रेलरमध्ये वेगवेगळ्या पात्रांच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला दिसतात. पण यात एक गोष्ट मात्र सामाईक आहे. होय, या प्रत्येकाचा एक भूतकाळ आहे आणि या भूतकाळाने प्रत्येकाच्या आयुष्यात वादळ निर्माण केलेय. मुंबईच्या एका चाळीची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमधून एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे, सामान्यांचे आयुष्यही जितके सोपे दिसते, तितके नक्कीचं नाही. येत्या ९ मार्चला चित्रपटगृहांत प्रेक्षकांच्या भेटीस येणाºया या चित्रपटात  शरमन जोशी, पुलकित सम्राट, रिचा चड्ढा. मासुमेह आणि रेणुका शहाणे मुख्य भूमिकेत आहे. प्रतिभा, आयशा अहमद आणि अंकित राठी काही नवे चेहरेही यात दिसताहेत.‘हम आपके है कौन’ या चित्रपटात सलमानच्या वहीणीची भूमिका साकारणारी रेणुका शहाणे या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर वापसी करतेय. यात ती गोव्याच्या एका वयोवृद्ध महिलेच्या भूमिकेत आहेत.अर्जुन मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट फरहान अख्तर, रितेश सिंधवानी यांची निर्मिती आहे. यापूर्वी फरहान अख्तर ‘लखनऊ सेंट्रल’मध्ये अभिनेता म्हणून दिसला होता. हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार कमाई करू शकला नाही पण यातील फरहानचा अभिनय अनेकांना भावला होता. आता निर्माता या नात्याने फरहानचा हा चित्रपट लोकांना किती भावतो, ते बघणे इंटरेस्टिंग असणार आहे. यापूर्वी ‘डॉन- द चेन्ज बीगीन्स अगेन’, ‘हनीमून ट्रॅव्हल्स प्राय. लिमि.’, ‘रॉक आॅन’, ‘लक बाय चान्स’. ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘डॉन2’ अशा चित्रपटांचाही निर्माता राहिलेला आहे.