Join us

इन्स्टाग्रामवर तापसी पन्नूचे तीस लाख फॉलोअर्स!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2017 21:21 IST

साउथमधून बॉलिवूडमध्ये आलेल्या अभिनेत्री तापसी पन्नू हिने अल्पावधितच आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. सोशल मीडियावर सध्या तापसीचा बोलबाला ...

साउथमधून बॉलिवूडमध्ये आलेल्या अभिनेत्री तापसी पन्नू हिने अल्पावधितच आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. सोशल मीडियावर सध्या तापसीचा बोलबाला असून, इन्स्टाग्रामवर तीस लाखांपेक्षा अधिक तिचे फॉलोअर्स आहेत. तापसीकरिता ही बाब एखाद्या अ‍ॅचिव्हमेंटसारखी असून, तिची लोकप्रियता अधोरेखित करणारी आहे. वास्तविक तापसी नेहमीच इन्स्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह असते. फोटोज् आणि व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. ती जे काही फोटोज पोस्ट करते त्यास तिच्या चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असतो. त्यामुळेच अल्पावधितच तिच्या फॉलोअर्सची संख्या तीस लाखांच्या वर गेली आहे. याविषयी तापसीने सांगितले की, ‘सध्याचा विचार केल्यास इन्स्टाग्राम अतिशय उत्तम मीडिया प्लॅटफॉर्म आहे. कारण इतर सोशल मीडिया टुल्सच्या तुलनेत इन्स्टाग्राम सर्वाधिक प्रभावी आहे, असे मला वाटते. माझ्या इन्स्टा परिवारात एवढ्या सगळ्या लोकांचे कमीत कमी कालावधीत आगमन झाल्याने मी खूपच रोमांचित आहे. कारण मी इन्स्टावर काही काळापूर्वीच आली अन् यूजर्सनी मला पसंती दिल्याचे समाधान वाटते. दरम्यान, तापसी सध्या डेविड धवन यांच्या ‘जुडवा-२’मध्ये काम करीत असून, सध्या ती चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता वरुण धवन आणि जॅकलीन फर्नाडिज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तापसीच्या गेल्या ‘पिंक’ आणि ‘नाम शबाना’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले गेले होते. हे चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखवू शकले नसले तरी, तापसीचा अनुभव खूपच सरस असल्याचे निरीक्षण समीक्षकांनी नोंदविले होते.