Join us

​‘सुल्तान’चे तीन leaked plots... खरे की खोटे??

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 20:33 IST

’सलमान खानच्या ‘सुल्तान’ची सगळेच आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. ‘सुल्तान’संदर्भातील कुठलीही गोष्ट लीक व्हायला नको, असे सुरुवातीपासून प्रयत्न केले गेले. ...

’सलमान खानच्या ‘सुल्तान’ची सगळेच आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. ‘सुल्तान’संदर्भातील कुठलीही गोष्ट लीक व्हायला नको, असे सुरुवातीपासून प्रयत्न केले गेले. पण हे प्रयत्न फोल ठरले, असेच म्हणायला हवे. कारण आता ‘सुल्तान’च्या कथेचे एकूण तीन प्लॉट अर्थात ‘सुल्तान’च्या तीन वेगवेगळ्या कथा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. हे तिन्ही लीक झालेले प्लॉट वाचून लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही वाचायला मिळत आहे. काहींना हे प्लॉट रोचक वाटत आहेत तर काहींना कंटाळवाणे. तेव्हा बघूयात, ‘सुल्तान’चे लीक प्लॉट कोणकोणते आहेत, ते...पहिला प्लॉट:एका प्लॉटनुसार, अनुष्का म्हणजे आरफाचे प्रेम सुल्तानला पहेलवान बनायला उद्युक्त करते. मी तुमच्या मुलीसाठी सर्वात चांगला मुलगा आहे, हे सिद्ध करण्यासाठी सुल्तान आरफाच्या वडिलांना आॅलम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकून आणेल असे वचन देतो. त्यासाठी तो दिवसरात्र मेहनत घेतो आणि आॅलम्पिकमध्ये पदक मिळवतो सुद्धा. पण या सगळ्यात तो आरफाला हरवून बसतो. पहिला प्लॉट:एका प्लॉटनुसार, अनुष्का म्हणजे आरफाचे प्रेम सुल्तानला पहेलवान बनायला उद्युक्त करते. मी तुमच्या मुलीसाठी सर्वात चांगला मुलगा आहे, हे सिद्ध करण्यासाठी सुल्तान आरफाच्या वडिलांना आॅलम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकून आणेल असे वचन देतो. त्यासाठी तो दिवसरात्र मेहनत घेतो आणि आॅलम्पिकमध्ये पदक मिळवतो सुद्धा. पण या सगळ्यात तो आरफाला हरवून बसतो.दुसरा प्लॉट : सोशल मीडियावर लीक झालेल्या या प्लॉटमधील स्टोरी सुद्धा पहिल्या प्लॉटशी मिळती जुळतीच आहे. आरफाच्या प्रेमामुळे सुल्तान आॅलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवतो व हे यश साजरे करायला आरफा त्याच्यासोबत नसते. तो निराश होतो. स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतो. पण एकेदिवशी आरफा त्याच्या स्वप्नात येते. तुझ्यावर मी यासाठी प्रेम केलेल नाही, असे ती त्याला सांगते. यानंतर सुल्तान पुन्हा ‘सुल्तान’ होतो.तिसरा प्लॉट : सोशल मीडियावर ‘सुल्तान’ची आणखी एक स्टोरी लीक झाली आहे. या सलमान एक भ्रष्ट सरकारी कर्मचारी बनलेला दाखवलेला आहे. जो वरच्या कमाईवर आयुष्य जगत असतो. पण यानंतर त्याच्या आयुष्यात असे काही घडते की त्याला देश म्हणजे काय, हे कळते आणि तो पहेलवान बनून देशासाठी खेळतो.   ‘सुल्तान’चे हे प्लॉट खरे की खोटे माहित नाही. पण सोशल मीडियावर लीक झालेले हे प्लॉट सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. कथाच लीक झाल्याने अनेकांची     निराशाही झाली आहे. अर्थात खरे काय, हे येत्या ६ जुलैलाच कळणार आहे..तेव्हा वेट अ‍ॅण्ड वॉच...