नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी आज मराठी, बॉलिवूड चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अग्निसाक्षी, क्रांतीवीर या चित्रपटांना रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. त्यांना आजवरच्या अनेक भूमिकांसाठी पुरस्कार मिळाले आहेत. नुकतेच ते हाऊसफुल ५मध्ये पाहायला मिळाले. नुकतेच त्यांनी एका कार्यक्रमात देवळात ते जात नसल्याचे सांगितले.
नाना पाटेकर म्हणाले की, "देवळात मी जात नाही जाणीवपूर्वक, देव मानत नाही अशातला भाग नाही. माणसाचा जन्म दिलाय खूप झालं की, वारंवार तिथे जाऊन त्याला कुठे त्रास द्यायचा. आठ आणे टाकायचे लाख रुपये दे म्हणायचं...नाही, कशाला पाहिजे! माणूस म्हणून जन्माला घातलं तो जन्म पूर्ण सार्थकी लागेल असं म्हणायचं, जगायचं आणि एक दिवस मरून जायचं. कोण अमरपट्टा घेऊन आलं आहे."
वर्कफ्रंट
नाना पाटेकर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ते शेवटचे हाऊसफुल ५मध्ये झळकले होते. या चित्रपटातील त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले.या आधी ते वनवास या सिनेमात काम करताना दिसले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट फारसा बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस.राजामौली त्यांच्या आगामी SSMB29 सिनेमात नाना पाटेकर दिसणार असल्याचे बोलले जात होते. पण त्यांनी या सिनेमातून एक्झिट घेतली.