Join us

करिश्मा कपूरच्या एक्स हसबण्डने केला तिसरा विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2017 21:17 IST

अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूर तिसºयांदा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. बॉलिवूडलाइफ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार संजयने मॉडेल ...

अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूर तिसºयांदा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. बॉलिवूडलाइफ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार संजयने मॉडेल प्रिया सचदेवसोबत लग्न केले आहे. गेल्या महिन्यापासून हे दोघे लग्न करणार असल्याची चर्चा होती. गेल्या वर्षीच करिश्मा आणि संजय दोघे वेगळे झाले होते.  संजय कपूरचे हे तिसरे लग्न आहे, करिश्मासोबत लग्न करण्याआधीही त्याचा एक घटस्फोट झाला होता. दिल्लीच्या एका मोठ्या व्यावसायिक कुटुंबाशी संबंध असलेल्या प्रियाचेही हे दुसरे लग्न आहे. प्रिया आणि संजयचे अफेअर पाच वर्षांपासून सुरू होते, अशी चर्चा आहे. प्रिया सचदेवचे यापूर्वी न्यूयॉर्कस्थित उद्योगपती विक्र म चटवालसोबत लग्न झाले होते. प्रिया आणि संजय २०१३ पासून एकमेकांच्या प्रेमात असल्याचे सांगितले जाते.  या लग्नाबाबत चर्चा होऊ नये याची संजयच्या कुटुंबाकडून पूर्ण काळजी घेण्यात आली होती, त्यामुळे या विवाहाचे जास्त फोटो अजून बाहेर आलेले नाहीत. करिश्मासोबत झालेल्या घटस्फोटानंतर संजयला पुन्हा प्रकाशझोतात यायची इच्छा नसल्याचे यामागे कारण सांगितले जात आहे.   संजय आणि करिश्माचे २००३ मध्ये लग्न झाले. त्यांनी २०१० मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. जुलै २०१६ मध्ये बांद्र्यातील कौटुंबिक न्यायालयाने त्यांचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. संजयपासून करिश्माला समायरा (११) आणि कियान राज (६) ही दोन मुले आहेत. ही दोन्ही मुले करिश्माजवळ राहतात.