Join us

​हे स्टारकिड्स आहेत, जस्टीन बीबरच्या स्टाईलचे ‘दिवाने’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2017 10:55 IST

जस्टीन बीबरचे चाहते जगभर आहेत.  उण्यापुºया २३ वर्षांच्या वयात जस्टीनने अभूतपूर्व यश मिळवले आहे. खरे तर जस्टीन म्हणजे एक ...

जस्टीन बीबरचे चाहते जगभर आहेत.  उण्यापुºया २३ वर्षांच्या वयात जस्टीनने अभूतपूर्व यश मिळवले आहे. खरे तर जस्टीन म्हणजे एक वादग्रस्त सेलिब्रिटी. गाण्यापेक्षा बहुतेकदा तो त्याच्या कॉन्स्ट्रोवर्सीमुळेच अधिक चर्चेत असतो.  तो असे काही करतो की, वाद निर्माण होतो . जस्टीन बीबर अतिशय मिजासखोर आणि उद्धट आहे, असे म्हटले जाते. स्वत:चा पूर्णपणे न्यूड फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यापासून तर आपल्या पे्रयसीशी भररस्त्यात सेक्स करण्यापर्यंतच्या त्याच्या अनेक कॉन्ट्रोवर्सी प्रसिद्ध आहेत. पण असे असूनही जस्टीनने जगाला वेड लावले आहे. केवळ त्याच्या गाण्यांनीच नव्हे तर त्याच्या स्टाईलनेही जगभरातील तरूणाईला वेड लावले आहे. ‘बेबी’ चेहºयाच्या या पॉप गायकाची स्टाईल एकदम हटके आहे.  त्याच्यावर प्रेम करणाºया, त्याच्या स्टाईलचे अनुकरण करणाºया गटाला ‘बेलीबर्स’ म्हणून ओळखले जाते.   फ्लॉपी केस, रिप्ड जीन्स,पायातील भलेमोठे वाटणारे स्नीकर्स असे सगळेच त्याच्या स्टाईलमध्ये येते. जगभरातील तरूणाई त्याच्या या स्टाईलचे डोळे झाकून अनुकरण करताना दिसते. भारतही त्याला अपवाद नाही. बॉलिवूडमधील अनेक स्टार किड्सही जस्टीनच्या स्टाईलचे दिवाने आहेत. जस्टीन बीबरची हेअरस्टाईल एकदम युनिक आहे. त्याच्या हेअरस्टाईलचे दिवाने कमी नाहीत. शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान हे जस्टीनच्या हेअरस्टाईलचे खूप मोठे चाहते आहेत. त्यामुळेच अनेकदा आर्यन व इब्राहिम जस्टीनच्या हेअरस्टाईलचे अनुकरण करताना दिसले. जस्टीनच्या स्नीकर्सचीही जबरदस्त के्रझ आहे. आर्यन खान, इब्राहिम खान आणि मलायका अरोरा व अरबाज खान यांचा मुलगा अरहान खान हे या स्टाईलचे दिवाने आहेत. त्यांचे हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचा अंदाज येईलच.