Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' बॉलिवूड स्टार्सचे आहेत परदेशात ही आशियाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2017 15:39 IST

बॉलिवूड अभिनेत्री-अभिनेत्यांची कमाई ही हॉलिवूड अभिनेत्यांना टक्कर देणारी आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी परदेशातही आपला आशियाना ...

बॉलिवूड अभिनेत्री-अभिनेत्यांची कमाई ही हॉलिवूड अभिनेत्यांना टक्कर देणारी आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी परदेशातही आपला आशियाना खरेदी केला आहे. शूटिंगमधून वेळा मिळाला की हे स्टार आपल्या हॉलिडे होममध्ये जाऊन राहणे पसंत करतात. कोणत्या स्टारसची कुठे आहेत घरे यावर टाकूया एक नजर.    शाहरुख खानमुंबईतला शाहरुख खानचा मन्नत हा बंगला पर्यटकांसाठी एक प्रेक्षणीय स्थळ आहे. मुंबईतल्या बंगल्यासोबतच शाहरुखचा दुबईमध्यले हॉलिडे होम सुद्धा जन्नत म्हणून ओळखले जाते.  2 मजली असलेला हा व्हिला 14000 स्केअर फिटचा हा व्हिला 8500 स्केअर फूट जागेवर बांधण्यात आला आहे. या व्हिलामध्ये प्राईव्हेट स्किमिंग पूल आणि बीचसुद्धा आहे. शाहरुख खानच्या या व्हिला किंमत जवळपास 17 कोटी 84 लाख आहे. किंग खानचा दुबईमध्ये लंडनमध्ये ही पोष पार्कसुद्धा त्याचे घर आहे. ज्याची किंमत जवळपास 100 कोटींच्या घरात आहे.   अमिताभ बच्चनबॉलिवूडच्या शहनशाह अर्थात अमिताभ बच्चन यांचे अनेक बंगले आहे हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. पण याव्यतिरिक्त त्यांचे पॅरिसमध्ये सुद्धा एक घर आहे. जे त्यांना त्याच्या प्रिय पत्नीने म्हणजेच जया बच्चन यांनी भेट दिले आहे.अभिषेक - ऐश्वर्या आपल्या वडिलांच्या पाठोपाठ अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी सुद्घा  दुबईतील जुमेराह रॉयल इस्टेटमध्ये रिसॉर्ट स्टाईल व्हिला विकत घेतला आहे. 10,600 स्केअर फूटाच्या व्हिलामध्ये स्विमिंग पूल आणि मोठे गार्डन यांचा समावेश आहे. या व्हिलाची किंमत अंदाजे 60 ते 70 कोटींच्या घरात आहे.  जॉन अब्राहाम आधी मॉडेल मग अभिनेता आणि आता बिझनेसमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जॉनचे घर बेल एअर, लॉस अँजेल्स यूएसए इथे आहेत. या बॉलिवूडच्या हँडसम हंकचे शेजारी एंजेलिना जोली आणि जेनिफर एनिस्टन राहाते.अक्षय कुमारखिलाडी कुमार ही या रेसमध्ये मागे नाही आहे त्यांने ही घरामध्ये गुंतवणूक केली आहे. अक्षय कुमार कॅनडला घर घेतले आहे यावेळी त्यांने फक्त अपार्टमेंट न घेता संपूर्ण टेकडी खरेदी केली आहे. ज्यात अपार्टमेंट आणि बंगले आहेत एवढेच नाही तर त्यांचे मॉरिशसच्या सुंदर बीचवर त्याचा बंगलादेखील आहे.   सैफ आणि करिनासैफ अली खान आणि करिना कपूर या दोघांचेही स्वित्झर्लंड हे आवडते ठिकाण आहे त्यामुळे याठिकाणी त्यांनी हॉलिडे होम खरेदी केला आहे. संधी मिळाली की दोघेही तिथे जाऊन राहणे पसंत करतात.