Join us

भूमिच्या बर्थडेला आली वाणीही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 11:11 IST

 ‘दम लगा के हैशा’ फेम भूमी पेडणेकर हिचा २७ वा बर्थडे तिने जवळचे मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसमवेत साजरा करण्यात आला. ...

 ‘दम लगा के हैशा’ फेम भूमी पेडणेकर हिचा २७ वा बर्थडे तिने जवळचे मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसमवेत साजरा करण्यात आला. तिच्या वाढदिवसाला कोण असेल ? याचा काही अंदाज करू शकता का? तर ‘बेफिक्रे’ ची अभिनेत्री वाणी कपूर.बेफिक्रे मध्ये रणवीर सिंगसोबत वाणी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. वाणी-भूमी या बी टाऊनच्या ‘बीएफएफ’ असून तिने सोशल साईट्सवर भूमिच्या बर्थडे पार्टीचा फोटो अपलोड केला आहे.त्याला तिने कॅप्शन दिले आहे की,‘ हॅप्पी बर्थडे लव्ह. बॅक टू माय फॅम फॅम.’ जेव्हा ‘बेफि क्रे’ चित्रपटाची शूटींग संपली तेव्हा राणी आणि आदित्य यांच्यासोबत टीमचा फोटो शेअर करण्यात आला. तसेच भूमी ‘मनमर्जियाँ’ मध्ये आयुषमान खुरानासोबत दिसणार आहे.