एका भांडणामुळे दिशा पटनीवर आली अशी वेळ!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2017 14:34 IST
टायगर श्रॉफची गर्लफ्रेन्ड दिशा पटनी सध्या स्वत:चे काम स्वत: पाहते आहे. याचे कारण पीआर टीमसोबतचे तिचे भांडण. होय, दिशाने ...
एका भांडणामुळे दिशा पटनीवर आली अशी वेळ!!
टायगर श्रॉफची गर्लफ्रेन्ड दिशा पटनी सध्या स्वत:चे काम स्वत: पाहते आहे. याचे कारण पीआर टीमसोबतचे तिचे भांडण. होय, दिशाने तिच्या पीआर टीमसोबतचे संबंध पूर्णपणे तोडले आहेत. ‘एम एस धोनी: दी अनटोल्ड स्टोरी’नंतर दिशाला एकही चित्रपट मिळालेला नाही. काही दिवसांपूर्वी नाही म्हणायला तिला एका चित्रपटाची आॅफर मिळाली होती. सुशांतसिंह राजपूतसोबतचा सिनेमा तिला आॅफर झाला होता. पण दिशाने या चित्रपटाला नकार दिला. ही बातमी दिशाच्या टीमने नाही तर तिने खुद्द शेअर केलीय. एकंदर काय तर दिशा आता स्वत:च स्वत:ची पब्लिसिटी करतेय.अनेक स्टार्स स्वत:चे काम आणि मीडिया मॅनेज करण्यासाठी पीआर टीम हायर करतात. या टीमच्या माध्यमातून सतत प्रकाशझोतात राहणे, वेगवेगळे इव्हेंट मॅनेज करणे, अशी सगळी स्टार्सची कामे यामाध्यमातून होत असतात. पण आता टीमसोबत भांडण झाल्याने हा जिम्मा दिशाच्या खांद्यावर आला आहे. या भांडणाचे नेमके कारण आम्हाला माहित नाही. पण येत्या काळात दिशा आपले काम स्वत: कसे सांभाळते, यावर आमची नजर राहणार आहे. याकामी दिशाला तिचा बॉयफ्रेन्ड टायगर श्रॉफ याच्याकडून काही धडे घ्यायलाच हवेत. कारण टायगरला चर्चेत राहण्याची कला चांगलीच अवगत झाली आहे. असो, खरे तर पीआरटीमसोबत स्टार्सची भांडणे इंडस्ट्रीला नवी नाहीत. काही दिवसांपूर्वी सलमान खाने त्याची पीआर रेशमा शेट्टी हिला काढून टाकले होते. ती गत १४ वर्षांपासून सलमानसाठी काम करत होती. प्रियांका चोप्रा आणि तिचा मॅनेजर यांचे भांडणही चांगलेच गाजले होते. दिशा याच रांगेतील पुढची व्यक्ती ठरलीय, एवढेच.