Join us

‘लव्ह एट फर्स्ट साईट’ असे जगात काहीही नसते...! शिल्पा शेट्टी काय म्हणतेय ऐकलत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 21:30 IST

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा हिचा ‘हिअर मी लव्ह मी’ हा ब्लार्इंड डेटींग शो येत्या २८ तारखेपासून सुरू होतोय. अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रसारित होऊ घातलेल्या या शोची थीम आत्तापर्यंतच्या शोपेक्षा एकदम वेगळी आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा हिचा ‘हिअर मी लव्ह मी’ हा ब्लार्इंड डेटींग शो येत्या २८ तारखेपासून सुरू होतोय. अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रसारित होऊ घातलेल्या या शोची थीम आत्तापर्यंतच्या शोपेक्षा एकदम वेगळी आहे. या शोमध्ये एका तरूणीला तीन मुलांमधून आपला जोडीदार निवडता येईल. पण या मुलांचे चेहरे ही तरूणी पाहू शकणार नाही. केवळ त्यांच्यातील प्रतीभा, त्यांच्या सवयी अशा काही गोष्टीवरून तिला तिघांपैकी एकाची निवड करावी लागेल.

सध्या शिल्पा या शोच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अलीकडे दिल्लीत शिल्पा या शोच्या प्रमोशनसाठी पोहोचली. यावेळी शिल्पाला वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. यापैकी एका प्रश्नावर शिल्पाने असे काही उत्तर दिले की, सगळेच अवाक झालेत. होय, ‘लव्ह एट फर्स्ट साईट’ असे काहीही नसते, असे शिल्पा यावेळी म्हणाली. ‘लव्ह एट फर्स्ट साईट’ अशी एक मान्यता आहे. तुझा शो याला पूर्णपणे छेद देणारा आहे. हा लोकांचे विचार बदलण्याचा प्रयत्न आहे का? असा प्रश्न शिल्पाला केला गेला. यावर जगात ‘लव्ह एट फर्स्ट साईट’ अशी कुठलीही गोष्ट नसते, असे शिल्पा म्हणाली. पहिल्या नजरेत एखादी व्यक्ती तुम्हाला आवडू शकते. पण पहिल्याच नजरेत तुम्ही एखाद्याच्या प्रेमात कसे पडू शकता? समोरच्याच्या प्रेमात पडण्यासाठी ती व्यक्ती कळायला हवी आणि ते गरजेचे आहे. प्रेमात दोन व्यक्ती भावनात्मकरित्या एकमेकांत गुंतलेल्या असतात. अशावेळी त्यांनी एकमेकांना ओळखणे, जाणून घेणे गरजेचे आहे, असे शिल्पा म्हणाली. आमचा शो जोडप्यांचे लग्न करून देणार नाही. केवळ त्यांची त्यांच्या स्वप्नातील जोडीदाराची भेट घालून देणार आहे, असेही शिल्पा म्हणाली.या शोचा कॉन्सेप्ट मला आवडला आणि त्यामुळे मी तो स्वीकारला. आजपर्यंत मला आवडले तेच मी केलेय. मला ट्रेंड सेटर बनायचेयं, म्हणून मी काहीही करत नाही, असेही ती म्हणाली.

टॅग्स :शिल्पा शेट्टी