Join us

विद्यासोबत कामाचे प्लॅन्स नाही -सिद्धार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 04:52 IST

तुम्हाला जर लव्हबर्ड सिद्धार्थ रॉय कपूर आणि विद्या बालन यांना सोबत काम करतांना पाहायचे असेल तर सध्या तरी ते ...

तुम्हाला जर लव्हबर्ड सिद्धार्थ रॉय कपूर आणि विद्या बालन यांना सोबत काम करतांना पाहायचे असेल तर सध्या तरी ते शक्य नाही असे सिद्धार्थ रॉय कपूर म्हणाले. त्याच्यासोबत त्याच्या वैवाहिक आयुष्याविषयी चर्चा करण्यात आली. तेव्हा ते म्हणतात,' जेव्हा आम्ही एकमेकांच्या बंधनात अडकलो ते क्षण खुपच वेगळे आणि सुंदर होते. ' त्याला विचारण्यात आले की, भविष्यात विद्यासोबत काम करण्याचे काही प्लॅन्स आहेत का? तर ते म्हणाले,' नाही. सध्या तसे काही प्लॅन्स नाहीत. सध्या आम्ही एकत्र काम करत नाहीत. आम्ही एकत्र येणं आणि एकत्र काम करणे हे आमच्यासाठी खरंतर खुप आनंददायी आहे. पण ते शक्य नाही. ' सध्या सिद्धार्थ डिस्नेच्या म्युझिकल स्टेज 'ब्युटी अँण्ड द बिस्ट' वर काम करतोय.