Join us
Daily Top 2Weekly Top 5

सूत्रसंचालन सोडण्याचा विचारच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 15:40 IST

आयुषमान खुरानाने आज बॉलिवुडमध्ये त्याचे चांगलेच नाव कमावले आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यापासूनच केले आहे. आयुषमान हा ...

आयुषमान खुरानाने आज बॉलिवुडमध्ये त्याचे चांगलेच नाव कमावले आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यापासूनच केले आहे. आयुषमान हा त्याच्या सूत्रसंचालनासाठी चांगलाच प्रसिद्ध होता. त्याने एमटिव्हीवरील अनेक कार्यक्रम, इंडियाज गॉट टायलेंट यांसारख्या कार्यक्रमांचे त्याने केलेले सूत्रसंचालन गाजले होते. पण सध्या चित्रपटांमध्ये व्यग्र असल्याने त्याला छोट्या पडद्यावर काम करता येत नाहीये. छोट्या पडद्यासोबत माझे एक वेगळेच नाते असल्याचे आयुषमानचे म्हणणे आहे. छोट्या पडद्यावरूनच कामाला सुरुवात केल्यामुळे पुन्हा छोट्या पडद्यावर काम करण्याची इच्छा असल्याचे तो सांगतो. सूत्रसंचालन करणे ही गोष्ट तर माझ्या खूपच जवळची असल्याने मी ती कधीही सोडण्याचा विचारही करू शकत नाही असेही तो सांगतो.