सोशल मीडियावरून टीका नकोच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:01 IST
सोशल मीडियावरून टीका नकोचसोशल मीडियातील नकारात्मकतेमुळे मी या माध्यमापासून चार हात दूरच राहतो. या माध्यमांचा वापर करून कुणावरही ...
सोशल मीडियावरून टीका नकोच
सोशल मीडियावरून टीका नकोच सोशल मीडियातील नकारात्मकतेमुळे मी या माध्यमापासून चार हात दूरच राहतो. या माध्यमांचा वापर करून कुणावरही शेरेबाजी आणि टीकेचा भडिमार करू नका, असे आवाहनही शाहरूखने आपल्या चाहत्यांना केलेय. एका थेट प्रक्षेपित होणाºया व्हिडीओ प्लॅटफॉर्मवरून संवाद साधताना शाहरूखने आपली मत व्यक्त केले. इतक्या उशिरा टिष्ट्वटर अकांऊंट का सुरू केले? या प्रश्नाचे उत्तर देताना शाहरूख म्हणाला, की या जगापासून दूर राहण्याचे कारण या माध्यमाद्वारे बराच मूर्खपणाचा मजकूरही तुमची इच्छा असो वा नसो, वाचावा लागतो. मी टिष्ट्वटरचा फारसा उपयोग करत नाही. मला लोकांची याद्वारे सुरू असलेली चिखलफेक आवडत नाही. माझ्या फोनवर असली नकारात्मकता पाहणं मला आवडत नाही. मी सोशल मीडियाद्वारे कुणाही अभिनेता-अभिनेत्रीवर टीका करत नाही. तुम्हीही अशी शेरेबाजी करू नका. सलमाननेही आपल्या चाहत्यांना टीका करणारी ‘टिष्ट्वटरबाजी’ करण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. अशी सोशल मीडियाद्वारे टीका करण्यापेक्षा एखाद्यावर टीकाच करायची असेल, तर त्याच्या तोंडावरच करा असेही शाहरुख म्हणाला.