Join us

​बॉलिवूड डेब्यूचा पत्ता नाही अन् जान्हवी कपूरच्या हाती लागला दुसरा सिनेमा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2017 10:54 IST

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर सध्या जोरात आहे. अहो, जोरात नाही तर काय? जिथे पहिल्याच बॉलिवूड डेब्यूचा पत्ता नाही, अन् ...

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर सध्या जोरात आहे. अहो, जोरात नाही तर काय? जिथे पहिल्याच बॉलिवूड डेब्यूचा पत्ता नाही, अन् पोरीच्या हाती दुसरा चित्रपट लागला म्हणे. होय, करण जोहर ‘सैराट’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक घेऊन येतोय. या रिमेकमधून जान्हवी बॉलिवूड डेब्यू करणार असल्याची खबर आहे. या डेब्यू सिनेमाची घोषणा अद्याप झालेली नाही. तोच जान्हवीची आणखी एका चित्रपटात वर्णी लागल्याची खबर येऊन धडकली आहे. होय, करणच्याच ‘स्टुडंट आॅफ दी ईअर’च्या सीक्चलमध्ये म्हणजेच ‘स्टुडंट आॅफ दी ईअर2’मध्ये जान्हवी दिसणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ हिरो म्हणून दिसणार आहे. आता जान्हवी टागयरची हिरोईन म्हणून दिसणार आहे.खरे तर या चित्रपटासाठी आधी सैफ अली खान व अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान हिचे नाव चर्चेत होते. ‘स्टुडंट आॅफ दी ईअर2’मधून सारा बॉलिवूड डेब्यू करणार, अशी जोरदार चर्चा होती. पण कुठे माशी शिंकली कळायला मार्ग नाही. पण साराने आपल्या बॉलिवूड डेब्यूसाठी एकता कपूर प्रॉडक्शनचा ‘केदारनाथ’  हा सिनेमा निवडला. या चित्रपटात ती सुशांत सिंह राजपूतच्या अपोझिट दिसणार आहे. त्यामुळे ‘स्टुडंट आॅफ दी ईअर2’मधून साराचा पत्ता कट झाला. एकंदर काय तर, सारा आऊट आणि जान्हवी इन असे झाले. त्यामुळेच जान्हवी जोरात आहे, असे आम्ही म्हटलेय.ALSO READ : अन् श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूरने हळूच टाकला ‘बॉम्ब गोळा’!सध्या जान्हवी तिच्या बॉलिवूड डेब्यूच्या तयारीत व्यस्त आहे. आता जान्हवीने  चाहत्यांना फार प्रतीक्षा करायला न लावता आपल्या बॉलिवूड डेब्यूची घोषणा करावी, इतकेच आपण म्हणू.