Join us

प्रियंकाच्या फॅशनची ऐशीतैशी, फॅशन डिझायनरनेच उडवली तिच्या फॅशन सेन्सची खिल्ली, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 15:52 IST

प्रियंकाच्या ड्रेसवर एका प्रसिद्ध डिझायनरने एक भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.

ठळक मुद्देवेन्डेल रॉड्रिक्सने सोशल मीडियाद्वारे तिच्या या गाऊनवर भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर लिहिले आहे की, काही कपडे घालण्याचे ठरावीक वय असते. 

देसी गर्ल आणि पिग्गी चॉप्स प्रियंका चोप्रा या ना त्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. नुकत्याच पार पडलेल्या ग्रॅमी अवॉर्डसमध्ये प्रियंकाचा अंदाज अगदी पाहण्यासारखा होता. यावेळी प्रियंका असा काही बोल्ड ड्रेस घालून या अवार्ड्सच्या रेड कार्पेटवर उतरली की, सगळेच थक्क झाले होते. फोटोमध्ये प्रियंकाने ऑफ व्हाईट गाऊन परिधान केला आहे. हा गाऊन डीप फ्रंट ओपन गाऊन आहे. तिचा गाऊनचा गळा मानेपासून पोटाच्या बेंबीपर्यंत ओपन आहे.प्रियांकाने डिझायनर राल्फ रुसोने डिझाइन केलेला गाऊन परिधान केला होता.पण या ड्रेसचा फ्रंट नेट अधिक डीप असल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं होते. यावेळी तिचा अंदाज सेक्सी नसून फक्त बोल्ड होता.

प्रियंकाच्या या अंदाजावर तिच्या चाहत्यांनी भन्नाट कमेंट दिल्या होत्या आणि आता वेन्डेल रॉड्रिक्सने सोशल मीडियाद्वारे तिच्या या गाऊनवर भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर लिहिले आहे की, काही कपडे घालण्याचे ठरावीक वय असते. 

प्रियंकाला आता आणखीन एका हॉलिवूड सिनेमाची लॉटरी लागली आहे. 'मॅट्रिक्स' सिनेमाच्या चौथ्या भागात ती दिसू शकते. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका व निर्मात्यांमध्ये या संदर्भात बातचीत सुरू आहे. आता ही चर्चा शेवटच्या टप्प्यात आली आहे. जर सर्व काही ठीक असेल तर लवकरच देसी गर्ल या प्रोजेक्टची घोषणा करण्याची शक्यता आहे. सध्या 'मॅट्रिक्स ४'मधील कलाकार ट्रेनिंग घेत आहे. लवकरच नॉर्थ कॅलिफोर्नियामध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रा