Join us
Daily Top 2Weekly Top 5

Then & Now:चंदेरी दुनियेला बाय बाय केलेली नदियाँ के पारची गुंजा आता दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 08:00 IST

साधना सिंह पिया मिलन, ससुराल, फलक,पापी संसार अशा विविध सिनेमात भूमिका साकारल्या.

नदियाँ के पार हा हिंदी  सिनेमा ८०च्या दशकात प्रचंड लोकप्रिय ठरला. या सिनेमातील गुंजा ही भूमिका रसिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. अभिनेत्री साधना सिंह यांनी ही भूमिका साकारली होती. उत्तर प्रदेशमधील छोट्या गावाच्या बॅकड्रॉपवर या सिनेमाची कथा साकारली होती. सिनेमाची दृश्यं रुपेरी पडद्यावर सर्वसाधारण वाटली असली तरी सिनेमाने रसिकांची मनं जिंकली होती. गुंजाची भूमिका साकारणाऱ्या साधना सिंह यांनी अभिनेत्री बनण्याचा स्वप्नातही विचार केला नसेल. मात्र साधना सिंह बहिणीसोबत एका सिनेमाची शुटिंग पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी सूरज बडजात्या यांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्या नदियाँ के पार सिनेमाच्या गुंजा बनल्या. 

साधना सिंह कानपूरच्या नोनहा नरसिंह या गावात राहतात. साधना सिंह यांनी साकारलेली निरागस गुंजा आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. साधना सिंह आजही जिथे जातात तिथे त्यांना गुंजा नावाने ओळखलं जातं. शहरातच नाही तर गावागावतही साधना सिंह यांचे अनेक चाहते आहे. त्या जिथं जातात त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांच्याभोवती चाहत्यांचा गराडा जमा होतो. त्यांची लोकप्रियता अशी की अनेकांनी आपल्या मुलींची नावं गुंजा ठेवली. नदियाँ के पार या सिनेमाचं शुटिंग जौनपूरमध्ये झाली होती. या सिनेमाचं शुटिंग संपलं त्यावेळी इथल्या ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले. शुटिंगच्या काळात साधना सिंह आणि तिथल्या ग्रामस्थांमध्ये आपुलकीचे आणि प्रेमाचं नातं निर्माण झालं होतं. १ जानेवारी १९८२ रोजी हा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकला होता. 

यानंतर साधना सिंह पिया मिलन, ससुराल, फलक,पापी संसार अशा विविध सिनेमात भूमिका साकारल्या. मात्र अचानक त्या या चंदेरी दुनियापासून दूर गेल्या आणि संसारात रमल्या. आपल्याला हव्या तशा भूमिका साकारायच्यात तसे सिनेमा बनत नसल्याने सिनेसृष्टीपासून दूर जात असल्याचे त्यांनी सांगितलं होतं. नदियाँ के पार सिनेमाला मिळालेल्या यशामुळेच सूरज बडजात्या यांना हम आपके है कौन सिनेमाची कल्पना सुचली. हा सिनेमा नदियाँ के पार सिनेमाच्या कथेवरच आधारित होता. हम आपके है कौन सिनेमातील सलमान खान आणि माधुरी दीक्षित या जोडीला एका रात्रीत स्टार बनवलं.