Join us
Daily Top 2Weekly Top 5

चाहत्यांसाठी खुशखबर! ‘Mirzapur’चा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 17:04 IST

Mirzapur 3 : अल्पावधीत लोकप्रिय झालेली आणि प्रेक्षकांना वेड लावणारी ‘मिर्झापूर’ या वेबसीरिजचा तिसरा सीझन कधी येतो, याकडे चाहते डोळे लावून बसले होते. अखेर प्रतीक्षा संपली आहे

Mirzapur 3 : अल्पावधीत लोकप्रिय झालेली आणि प्रेक्षकांना वेड लावणारी ‘मिर्झापूर’ या वेबसीरिजचा तिसरा (Mirzapur 3) सीझन कधी येतो, याकडे चाहते डोळे लावून बसले होते. अखेर प्रतीक्षा संपली आहे. होय,‘मिर्झापूर 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.या सीरिजच्या  पहिल्या दोन सीझनला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. आता निमार्त्यांनी ‘मिर्झापूर 3’ची तयारी सुरू केली आहे. ‘मिर्झापूर’ मध्ये कालीन भैयाच्या पत्नीची भूमिका करणारी लोकप्रिय अभिनेत्री रसिका दुग्गल हिने आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. यात तिने याबाबतचे संकेत दिले आहे.

 रसिकाने ‘मिर्झापूर 3’मध्ये दिसणाऱ्या कलाकारांचा एक व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.   या व्हिडिओमध्ये कालीन भैया, गुड्डू पंडित, मुन्ना भैया आणि बीना त्रिपाठी दिसत आहेत. याशिवाय तिसऱ्या सीझनमध्ये ट्विस्ट आणण्यासाठी निर्मात्यांनी आणखी काही नवे चेहरे देखील निवडले आहेत.

‘मिझार्पूरचा तिसरा सीझन  लवकरच येणार आहे. आता तो कधी येणार हे फक्त अमेझॉन प्राइमवाले सांगू शकतात. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी वाट पाहावीच लागते ... तयार राहा...,’असं हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे.

‘मिर्झापूर 2’ मध्ये प्रत्येकजण मिर्झापूरच्या गादीवर बसण्यासाठी खटाटोप करताना दिसला.  कालीन भैया आणि त्यांचा उत्तराधिकारी मुन्ना भैया यांना गुड्डू पंडित गोळ्या मारतो. कालीन भैयाचा जीव वाचवण्यासाठी शरद त्याला घेऊन पळून जातो. आता तिसऱ्या पर्वात कालीन भैया पुन्हा अवतरणार आहे. तिसऱ्या सीझनमध्ये याच्या पुढची कथा दाखवण्यात येणार आहे.

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजपंकज त्रिपाठीवेबसीरिज