Join us

'गोलमाल'मधील आजीचा १८ वर्षात बदलला लूक, ९०च्या दशकातील अभिनेत्री लेटेस्ट फोटोत दिसतेय खूप वेगळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 12:59 IST

नव्वदच्या दशकात ही अभिनेत्री टीव्हीच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात आली होती.

नव्वदच्या दशकात अशा अनेक अभिनेत्री आल्या ज्या टीव्हीसोबतच बॉलिवूडमध्येही खूप सक्रिय होत्या. अशीच एक बबली अभिनेत्री होती जिने आपल्या क्यूट लुक्स आणि विनोदी शैलीने लोकांना खळखळून हसविले होते. या अभिनेत्रीने अनेक हिट टीव्ही मालिकांमध्ये काम केले असून तिचा नवराही एक उत्तम अभिनेता आहे. चित्रपटांसोबतच ही अभिनेत्री मोठ्या मल्टीस्टारर चित्रपटांमध्येही दिसली. सध्या ही अभिनेत्री पडद्यावर दिसत नसली तरी तिची अप्रतिम पुस्तके सातत्याने प्रकाशित होत आहेत.

नव्वदच्या दशकात ही अभिनेत्री टीव्हीच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात आली होती. होय, आम्ही बोलत आहोत बबली अभिनेत्री सुष्मिता मुखर्जी(Sushmita Mukherjee)बद्दल. रंगभूमीवर येणाऱ्या कलाकारांच्या गटात सुष्मिता मुखर्जीचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. सुष्मिता मुखर्जी करमचंद, हक्के बक्के, इसी बहाने, तलाश, कहीं किसी रोज, ये पब्लिक है सब जांती है ते बालिका वधू आणि इश्कबाज यांसारख्या टीव्ही मालिकांमधून सतत टीव्हीवर दिसली आहे. सुष्मिता मुखर्जीने गोलमाल सिनेमात साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. हा चित्रपट रिलीज होऊन १८ वर्षे उलटले आहेत आणि अभिनेत्री लेटेस्ट फोटोत खूपच वेगळी दिसते आहे. 

सुष्मिता मुखर्जीने अभिनेता आणि दिग्दर्शक राजा बुंदेलासोबत लग्न केले. सुष्मिता मुखर्जी ही एक उत्तम अभिनेत्री तसेच लेखिका आहे. सुष्मिता आता पडद्यावर कमी दिसत आहे पण तिची पुस्तके मुबलक प्रमाणात प्रकाशित होत आहेत. तिचे नटी हे पुस्तक यावर्षी प्रकाशित झाले आहे.