Join us
Daily Top 2Weekly Top 5

'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्माचा नवीन सिनेमा, 'या' मराठमोळ्या अभिनेत्यासोबत झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 13:46 IST

'ब्लू व्हेल गेम' वर आधारित असणार 'द गेम ऑफ गिरगीट' सिनेमा.

'द केरळ स्टोरी' चित्रपटामुळे मुख्य भूमिका साकारणारी अदा शर्मा (Adah Sharma) हे नाव आता सर्वांच्याच माहितीचं झालं आहे. सिनेमाचं कौतुक करणारे अदा शर्माच्या अभिनयाचेही चाहते झाले आहेत. सिनेमाने २०० कोटींच्या क्लबमध्येही एंट्री घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण टीम सध्या जल्लोष साजरा करत आहे.  तर दुसरीकडे अदा तिच्या पुढील प्रोजेक्टससाठी सज्ज झाली आहे.

मधल्या काळात 'ब्लू व्हेल गेम' खूपच व्हायरल झाला होता. अनेक लोक गेमच्या आहारी जाऊन स्वत:ला नुकसान पोहचवत होते. काहींनी तर टोकाचंही पाऊल घेतलं. याच गेमवर आधारित 'द गेम ऑफ गिरगीट' हा सिनेमा आहे. 'हेट स्टोरी' फेम विशाल पांड्या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमात अदा शर्मा पोलिसाची भूमिका साकारताना दिसणार आहे. तिने याआधी 'कमांडो' सिनेमात महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. सिनेमाचा प्लॉट खूपच इंटरेस्टिंग असणार आहे असं मेकर्सने म्हटलंय.

मराठी अभिनेत्यासोबत दिसणार अदा शर्मा 

'द केरळ स्टोरी' स्टोरी मध्ये भूमिका साकारणारी अदा शर्मा नवीन प्रोजेक्टसाठी खूपच उत्सुक आहे. तर सिनेमात मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेची (Shreyas Talpade) मुख्य भूमिका असणार आहे. श्रेयस यामध्ये अॅप डेव्हलपरच्या रोलमध्ये दिसणार आहे. याविषयी तो म्हणाला, "सिनेमाची कथा खूपच लक्षवेधी आहे. मी यासाठी उत्सुक आहे. प्रेक्षकांना विशेषत: तरुणांना महत्वाचा संदेश देणारा हा सिनेमा आहे."

' द गेम ऑफ गिरगीट' ही सध्याच्या पिढीची गोष्ट आहे. आजकालची तरुण पिढी कोणालाही आपली वैयक्तिक माहिती देते आणि त्याचे परिणाम वाईट होतात, असं दिग्दर्शक विशाल पांड्या म्हणाले.

टॅग्स :अदा शर्मासिनेमाबॉलिवूडश्रेयस तळपदे