२०२३ मध्ये खळबळ माजवणाऱ्या 'द केरळ स्टोरी'च्या यशानंतर, आता त्याचा सीक्वल म्हणजेच 'द केरळ स्टोरी २' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. वाद आणि चर्चांच्या केंद्रस्थानी असूनही, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या ६ दिवसांत या चित्रपटाने २० कोटी रुपयांचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे.
बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई
sacnilk ने दिलेल्या वृत्तानुसार, 'द केरळ स्टोरी २' ने पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक प्रतिसाद मिळवला आहे. ६ व्या दिवशी (बुधवारी) चित्रपटाच्या कमाईत चांगली वाढ पाहायला मिळाली. या चित्रपटाने आतापर्यंत एकूण २० कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला असून, कामाच्या दिवसांतही प्रेक्षकांची चित्रपटगृहांमध्ये गर्दी कायम आहे. हा आकडा पाहता, चित्रपट लवकरच ५० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
अदिती भाटिया आणि उल्का गुप्ता यांची चर्चा
यावेळी चित्रपटात जुन्या स्टारकास्टऐवजी नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री अदिती भाटिया आणि उल्का गुप्ता यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. अदिती भाटियाच्या कामाचे विशेष कौतुक होत असून, एका संवेदनशील विषयाला तिने न्याय दिला असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. तसेच उल्का गुप्तानेही आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले आहे.
सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही लोकांनी सिनेमाला प्रपोगंडा विचारधारेचा प्रचार म्हटले आहे, तर काहींनी हे सत्य समोर आणल्याबद्दल निर्मात्यांचे आभार मानले आहेत. मात्र, या वादाचा फायदा चित्रपटाला होताना दिसत असून, मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग हा चित्रपट पाहण्यासाठी जात आहे. येणाऱ्या आठवड्यात कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित होत नसल्यामुळे, 'द केरळ स्टोरी २' ला आपली कमाई वाढवण्याची मोठी संधी आहे.
Web Summary : 'The Kerala Story 2' earns over ₹20 crore in six days. Despite controversy, the film attracts audiences with Aditi Bhatia and Ulka Gupta in leading roles, sparking mixed social media reactions.
Web Summary : 'द केरला स्टोरी 2' ने छह दिनों में 20 करोड़ रुपये से अधिक कमाए। विवादों के बावजूद, अदिति भाटिया और उल्का गुप्ता अभिनीत फिल्म दर्शकों को आकर्षित कर रही है, सोशल मीडिया पर मिली-जुली प्रतिक्रियाएँ।