विपुल अमृतलाल शाह यांचा बहुचर्चित सिनेमा ‘द केरळ स्टोरी 2: गोज बियॉन्ड’ सिनेमाचं जबरदस्त मोशन पोस्टर अखेर रिलीज झालं आहे. प्रत्येक फ्रेममध्ये भीती, वेदना आणि कटू सत्य पाहायला मिळतं. या चित्रपटाचा टीझर ३० जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असून, हा सिनेमा पूर्णपणे सत्य घटनांपासून आणि गंभीर वास्तवापासून प्रेरित असल्याचा दावा करण्यात आला आहे.
‘द केरळ स्टोरी’द्वारे समाजाला हादरवून टाकणाऱ्या सत्याची मांडणी करणारे विपुल अमृतलाल शाह आता आणखी एक भयाण वास्तव प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. ‘द केरळ स्टोरी 2: गोज बियॉन्ड’चं हे मोशन पोस्टर अंगावर काटा आणणारं, अस्वस्थ करणारं आणि तीव्र संताप व्यक्त करणारं आहे. या मोशन पोस्टरमध्ये महिलांच्या डोळ्यातील अश्रू, भीती आणि संतापाने भरलेले चेहरे दिसतात. हा सीक्वल पहिल्या भागापेक्षा अधिक खोल, अधिक भयावह असणार आहे. यावेळी निर्माते अशा सत्यांचा उलगडा करण्याचा दावा करत आहेत जे फसवणूक, मानवता आणि द्वेष यांच्याही पलीकडे जातात.
हा मोशन पोस्टर आतापर्यंतच्या सर्वात अस्वस्थ करणाऱ्या आणि थरारक पोस्टर्सपैकी एक मानला जात असून, चित्रपटात समोर येणाऱ्या भयानक सत्यांची झलक देतो. कोणतीही तडजोड न करता, प्रेक्षकांसमोर निर्भीडपणे वास्तव मांडण्याचा सिनेमाचा उद्देश यात ठळकपणे दिसून येतो. याच पोस्टरमध्ये टीझरची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट देशातील मोठ्या ब्लॉकबस्टरपैकी एक ठरला होता. ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर यांसारख्या संवेदनशील विषयांवर थेट भाष्य करत या सिनेमाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले.
‘द केरळ स्टोरी 2: गोज़ बियॉन्ड’ हा सिनेमा सनशाइन पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नॅशनल अवॉर्ड विजेते कमाख्य नारायण सिंह यांनी केले आहे. कथा व पटकथा अमरनाथ झा आणि विपुल अमृतलाल शाह यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे सह-निर्माते आशिन ए. शाह आहेत. संगीत मनन शाह यांचे असून, गीते मनोज मुंतशिर यांनी लिहिली आहेत. हा सिनेमा २७ फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Web Summary : Vipul Amrutlal Shah's 'The Kerala Story 2: Goes Beyond' motion poster reveals a harrowing reality. The teaser arrives January 30th. Promising deeper truths beyond deceit, the film, directed by Kamakhya Narayan Singh, is set to release on February 27, 2026.
Web Summary : विपुल अमृतलाल शाह की 'द केरला स्टोरी 2: गोज बियॉन्ड' का मोशन पोस्टर एक भयावह सच्चाई उजागर करता है। टीज़र 30 जनवरी को आएगा। निर्माता गहरे रहस्यों से पर्दा उठाने का दावा कर रहे हैं। फिल्म 27 फरवरी, 2026 को रिलीज होगी।