The Great Indian Kapil Show Season 3: 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चे दोन सीझन प्रचंड यशस्वी ठरल्यानंतर आता या शोचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधीच्या दोन पर्वाप्रमाणेच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल. नव्या सीझनबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय. कारण या शोमध्ये भाईजान सलमान खान (Salman Khan) पहिला पाहुणा असणार आहे.
पहिल्या या एपिसोडचा टीझर नुकताच रिलीज झाला. बॉलिवूडच्या भाईजानने त्याचा स्वॅग दाखवत सेटवर एन्ट्री घेतली. नेहमीप्रमाणे सुनील ग्रोव्हर सलमानची नक्कर करताना दिसला. यावेळी स्वतःची नक्कल पाहून सलमान खानची प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या टीझरवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्यात. स्वतःची नक्कल पाहून सलमान खान सुनील ग्रोव्हरवर भडकणार की त्याचं कौतुक करणार हे एपिसोड पाहिल्यावर स्पष्ट होईल.