अनुराग कश्यप (Anurag Kashyap) दिग्दर्शित 'निशानची' (Nishanchi Movie) या आगामी चित्रपटातील एक हटके आणि धमाल गाणं 'फिलम देखो' रिलीज केलं आहे. या गाण्याचं संगीत अनुराग सैकिया यांनी दिलं असून, शब्द शश्वत द्विवेदी यांनी लिहिले आहेत आणि ते मधुबंती बागची यांच्या सशक्त आवाजात सजले आहे. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये अनुराग कश्यपच्या वेगळ्याच फिल्मी जगाची झलक पाहायला मिळते. गाण्याची हुक लाईन "फट-ता है कैसे ये बम देखो, ये फिलम देखो!" खूपच ठसठशीत आहे.
'फिलम देखो' हे गाणं त्याच्या हटके शब्दरचनेमुळे संगीतप्रेमींना मस्ती आणि स्टाईल यांचं अनोखं कॉम्बिनेशन देतं. या ट्रॅकमध्ये टेढी-मेढी फिलॉसॉफी, डार्क चॉकलेटसारखी फँटसी आणि खोल भावना एका वेळी मांडण्यात आल्या आहेत. 'फिलम देखो' हे केवळ एक गाणं नाही, तर 'निशानची' चित्रपटाची धडपडती लय आहे. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये जोरदार व्हिज्युअल्स, धमाकेदार कोरिओग्राफी आणि सिनेमाच्या एनर्जीची झलक पाहायला मिळते.
संगीतकार अनुराग सैकिया म्हणाले, '''निशानची'साठी संगीत देणं ही एक रंजक पण आव्हानात्मक यात्रा होती. प्रत्येक गाण्याला स्वतःची ओळख देणं आणि अनुराग कश्यपच्या कल्पनांशी सुसंगत राहणं हे सोपं नव्हतं. 'फिलम देखो' हे गाणं आम्ही असं बनवलं आहे की ते केवळ एक ट्रॅक वाटू नये, तर चित्रपटाचं अँन्थम वाटावं. सिनेमा सारखंच हटके, सिनेमॅटिक आणि लक्षात राहणारं. मधुबंतीने जसं हे गायलं आहे, त्याने या गाण्याला जीव आणि ताजेपणा दोन्ही मिळाले. आमचा उद्देश स्पष्ट होता. सगळे नियम बाजूला ठेवा आणि सिनेमा विश्वात उडी मारा.''
गायिका मधुबंती बागची यांनी सांगितलं, '''फिलम देखो' गाणं माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव होता. जेव्हा मी हे गाणं पहिल्यांदा ऐकलं, तेव्हा त्याची ऊर्जा आणि हटकेपणा लगेच जाणवला. हे काही टिपिकल गाणं नाही. यात मस्ती आहे, नटखटपणा आहे, आणि गाणं ऐकता ऐकताच गोंधळ घालायची भावना होते. या गाण्याचा भाग होणं माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे, या गाण्याने एक छोटासा डिस्क्लेमरही इतका खास बनवला आहे की प्रेक्षक त्याची वाट पाहतील.''
अनुराग कश्यप दिग्दर्शित 'निशानची' ही कथा दोन भावांची आहे, जे वेगवेगळ्या मार्गांवर चालले आहेत आणि त्यांच्या निवडीच त्यांचं भविष्य ठरवतात. चित्रपटात वेदिका पिंटो, मोनिका पनवार, मोहम्मद झीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा हे दमदार कलाकार दिसणार आहेत, जे कथेला अधिक गहिराई देतात. ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित ही फिल्म रॉ, एनर्जेटिक आणि देसी फ्लेवरने भरलेली आहे, जी प्रेक्षकांना थिएटरमध्ये अनुभवायला मिळणार आहे. ही फिल्म अजय राय आणि रंजन सिंग यांच्या जार पिक्चर्स बॅनरखाली, फ्लिप फिल्म्सच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. प्रसून मिश्रा, रंजन चंदेल आणि अनुराग कश्यप यांनी मिळून याचे लेखन केलं आहे. ही अॅक्शन, ह्युमर आणि ड्रामाने भरलेला सिनेमा १९ सप्टेंबर, २०२५ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.