Join us
Daily Top 2Weekly Top 5

आशा भोसले यांच्या निधनाने मनोरंजन विश्व सुन्न; चित्रपट निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 16:19 IST

आशा भोसले यांच्या निधनानंतर मनोरंजनसृष्टी शोकसागरात बुडाली आहे.

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या आगामी 'है जवानी तो इश्क होना है' या चित्रपटाच्या फर्स्ट लूकची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आज, १३ एप्रिल रोजी या चित्रपटाची पहिली झलक समोर येणार होती. मात्र, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. या महान गायिकेला आदरांजली वाहण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाच्या फर्स्ट लूकचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

आशा ताईंच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वाने आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. वरुण धवन, पूजा हेगडे आणि मृणाल ठाकूर यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'X' (ट्विटर) वर अधिकृत पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. त्यांनी लिहिले की, "ज्या आवाजाने अनेक पिढ्यांना संगीताची ओढ लावली, त्या महान आशा भोसले जी यांच्या निधनामुळे आम्ही काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सन्मानार्थ आम्ही चित्रपटाचा फर्स्ट लूक आता उद्या म्हणजेच १४ एप्रिल रोजी प्रदर्शित करू."

केवळ वरुण धवनचा चित्रपटच नाही, तर इतर मोठ्या चित्रपटांच्या निर्मात्यांनीही आशा ताईंच्या सन्मानार्थ महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्सने 'चांद मेरा दिल' या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकचे प्रदर्शन लांबणीवर टाकले आहे. आशा ताईंचे भारतीय संगीतातील योगदान अतुलनीय असल्याने, त्यांच्या निधनानंतर आनंद साजरा करणे योग्य नसल्याची भावना निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.

रितेश देशमुखच्या महत्त्वाकांक्षी 'राजा शिवाजी' या चित्रपटाबाबतही असाच निर्णय घेण्यात आला आहे. या चित्रपटाचे 'छत्रपती' हे अँथम गाणे १३ एप्रिलला प्रदर्शित होणार होते, मात्र तेही आता पुढे ढकलण्यात आले आहे. चित्रपट निर्माते लवकरच या गाण्याची नवी तारीख जाहीर करणार आहेत. संपूर्ण बॉलीवूडने आज आपले काम थांबवून आशाताईंना साश्रूनयनांनी निरोप दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Asha Bhosle's Death Shocks Entertainment World; Film Releases Postponed

Web Summary : Asha Bhosle's passing led Bollywood to postpone film releases and events as a mark of respect. Varun Dhawan's film first look delayed, and Karan Johar's title track release also postponed. Industry mourns the legendary singer.
टॅग्स :आशा भोसलेबॉलिवूडसंगीत