बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा हा लोकप्रिय अभिनेता नेहमीच चर्चेत राहिला होता. या अभिनेत्याने पाच वेळा लग्न केले, पण एकदाही तो स्थिरावू शकला नाही. त्याचा मृत्यू झाला तेव्हा लोक म्हणाले की, देवाने असा मृत्यू कोणाला देऊ नये. हा अभिनेता म्हणजे महेश आनंद (Mahesh Anand). लोक त्याला त्याच्या नावाने कमी आणि त्याच्या कामाने जास्त ओळखतात.
महेश आनंदने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यात शहेनशाह, सनम तेरी कसम आणि गंगा जमुना सरस्वती यांचा समावेश आहे. ९ फेब्रुवारी, २०१९ रोजी महेशने वयाच्या ५७ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. महेशने मॉडेल आणि डान्सर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. याच कारणामुळे तो त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये बॅकस्टेज डान्सर म्हणून दिसला. सनम तेरी कसममध्ये तो बॅकस्टेज डान्स करताना दिसली होती. १९८४ मध्ये महेशने करिश्मा चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. महेश आनंद अखेरचा गोविंदा स्टारर 'रंगीला राजा' या चित्रपटात दिसला होता.
अक्षय कुमारसोबत घेतला होता पंगामहेश आणि अक्षय कुमार यांच्यात मतभेद झाले होते. वक्त हमारा है या चित्रपटादरम्यान अक्षय आणि महेशमध्ये भांडण झाले होते. महेशने एका नाईट क्लबमध्ये महिलेसोबत गैरवर्तन केल्याचे सांगण्यात आले होते, यावरून त्यांच्यात वाद झाले होते. अभिनेता महेशने आपल्या एका फेसबुक पोस्टमध्ये सांगितले होते की, त्याच्या सावत्र भावाने त्याची ६ कोटी रुपयांची फसवणूक केली होती. ३०० चित्रपटांमध्ये काम केलेल्या या अभिनेत्याकडे शेवटच्या क्षणी पाण्याची बाटली घेण्यासाठीही पैसे नव्हते.
अभिनेत्याने केली पाच लग्नं, पण मिळालं नाही वैवाहिक सुखअभिनेत्याची पहिली पत्नी बरखा रॉय ही अभिनेत्री रीना रॉयची बहीण आहे. दुसरी पत्नी मिस इंडिया इंटरनॅशनल एरिका मारिया डिसूजा होती. १९९२ मध्ये महेशने मधू मल्होत्रासोबत तिसरे लग्न केले. २००० मध्ये अभिनेत्री उषा बचानी त्यांची चौथी पत्नी बनली. महेशचे शेवटचे आणि पाचवे लग्न रशियन महिला लानासोबत झाले होते. महेशने फेसबुक पोस्ट शेअर करून आपल्या पाचव्या पत्नीबद्दल सांगितले होते. त्याचवेळी काम न मिळाल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होऊ लागली आणि तो नशेच्या आहारी गेला.
तीन दिवस कुजत राहिला मृतदेह दारूच्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे महेश आनंदचा मृत्यू झाला. जेव्हा मोलकरणीने त्याच्या घराचा दरवाजा अनेकदा ठोठावला आणि कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा अभिनेत्याच्या बहिणीला कॉल करण्यात आला. दरवाजा तोडला तेव्हाअभिनेता बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. त्याचा टिफिन दोन दिवस दारातच पडून होता. महेशची विदेशी पत्नी आली आणि त्याचा मृतदेह रुग्णालयातून स्मशानभूमीत घेऊन गेली. असे म्हटले जाते की अभिनेत्याचा मृतदेह तीन दिवस खोलीत सडत होता.