Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूख खानची ही अभिनेत्री आहे खूप चांगली मैत्रीण, जिच्याकडून अभिनेत्याने गिरवलेत अभिनयाचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 17:59 IST

Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा 'जवान' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळे सध्या तो खूप चर्चेत आला आहे.

शाहरुख खानला 'किंग ऑफ रोमान्स' म्हटले जाते आणि त्याचे खूप चाहते आहेत. काजोल, राणी मुखर्जी आणि जुही चावला यांसारख्या सहकलाकारांचा तो चांगला मित्र आहे. तथापि, तुम्हाला माहित आहे का की आणखी एक अभिनेत्री आहे जी सुपरस्टारची सर्वात चांगली मैत्रीण आहे आणि ती असेही म्हणते की तिने त्याला अभिनय देखील शिकवला आहे? शाहरुख खानला अभिनय शिकवणारी आणि त्याची जिवलग मैत्रीण असलेली अभिनेत्री शाहिद कपूर आणि करीना कपूर खान स्टारर जब वी मेट मधील तिच्या भूमिकेसाठी लोकप्रिय आहे. एवढेच नाही तर त्याने शाहरुखसोबत १९८८ मध्ये आलेल्या दिल दरिया या नाटकातही काम केले आहे. ही अभिनेत्री म्हणजे दिव्या सेठ.

२०१५ मध्ये आपल्या ट्विटरवर दिव्या सेठसोबतचा एक फोटो शेअर करत शाहरुख खानने लिहिले होते, 'माझी बेस्ट फ्रेंड दिव्या, जिने मला अभिनय शिकवला. वाईट गोष्टींकडे पाहू नका, मी जे चांगले करतो ते फक्त तिच्या शिकवणीतून प्रेरित चांगले कार्य आहे.' थिएटरच्या काळात एकच शिक्षक शाहरुख खान आणि दिव्या सेठ यांना शिकवायचे. या दोघांना बॅरी जॉन यांनी मार्गदर्शन केले, ज्यांच्याबद्दल शाहरुख खान अनेकदा बोलतो.

दिव्या सेठ ही एक लोकप्रिय भारतीय अभिनेत्री आहे जिने विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाने स्वतःचे नाव कमावले आहे. अभिनेत्रीने तिचे माध्यमिक शिक्षण नवी दिल्लीतील कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी येथून पूर्ण केले आणि नंतर दिल्लीतल्या सेंट स्टीफन्स कॉलेज येथून इंग्रजी साहित्यात बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए) केले. दिव्या सेठने हम लोग या टीव्ही मालिकेत मझलीची व्यक्तिरेखा साकारून तिच्या प्रवासाला सुरुवात केली. हा शो भारतातील पहिला सोप ऑपेरा होता आणि शोमधील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अभिनेत्रीच्या प्रसिद्ध शोमध्ये अधिकार, दरार , आणि स्पर्श यांचा समावेश आहे, त्यानंतर तिने ५ वर्षांसाठी अभिनयातून ब्रेक घेतला.

दिव्या सेठने इंग्लिश विंग्लिश, दिल धडकने दो, जब वी मेट, ग्रॅंडसन ऑफ सरदार आणि इतर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. इतकेच नाही तर तिने सिटी ऑफ ड्रीम्स, दुरंगा, द मॅरीड वुमन आणि सँडविच्ड फॉरएव्हर यांसारख्या विविध वेब सीरिजमध्येही काम केले आहे. दिव्या सेठ शेवटची सरदार का ग्रॅण्डसनमध्ये दिसली होती, ज्यात अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत होता.

टॅग्स :शाहरुख खानजवान चित्रपट