Join us

'क्रिश' सिनेमातला 'छोटा कृष्णा' झालाय मोठा, अभिनयाला केला रामराम, आता ओळखूही शकणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 15:34 IST

'क्रिश' सिनेमात ज्युनियर कृष्णा म्हणजेच हृतिकच्या बालपणीची भूमिका साकारणारा अभिनेता इतका बदललाय की ओळखूच येणार नाही (Krrish, hrithik roshan)

हृतिक रोशनचा गाजलेला 'क्रिश' सिनेमा सर्वांना आठवत असेलच. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना 'क्रिश' सिनेमा आवडतो. 'क्रिश' सिनेमा जेव्हा रिलीज झाला तेव्हा हृतिक रोशनचा रोहित मेहरा आणि कृष्णा मेहरा हे डबल रोल प्रचंड गाजले. प्रियंका चोप्रा आणि हृतिक रोशन या दोघांच्या केमिस्ट्रीचं कौतुक झालं. 'क्रिश' मध्ये आणखी एक कलाकार चांगलाच गाजला. तो म्हणजे हृतिकच्या बालपणीची भूमिका साकारणारा कलाकार. त्याचं नाव मिकी धेमजानी. मिकी मोठा झाल्यावर डॉक्टर झाला आहे.

छोटा कृष्णा झालाय डॉक्टर; करतो हे खास काम

'क्रिश'मध्ये हृतिकच्या बालपणीची भूमिका साकारणारा अभिनेता मिकीने पुढे अभिनयाची वाट न धरता डॉक्टरकीचं शिक्षण घेतलं. तो आय-स्पेशालिस्ट म्हणजे नेत्रचिकित्सक झालाय. मिकीने सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहिलंय की, "तुम्ही मला याआधीही पाहिलंय. ओळखा पाहू? तुम्ही मला याआधी ज्युनियर क्रिश म्हणून पाहिलंय. सुपरटॅलेंटेड अभिनेत्यांसोबत काम करुन मला खूप आनंद झाला."

अभिनय प्रवासाचा कामात उपयोग- मिकी

मिकी व्हिडीओ शेअर करत पुढे म्हणाला, "एक बालकलाकार म्हणून माझा प्रवास सुरु झाला तो पुढे आय सर्जन पर्यंत येऊन पोहोचला.  हा प्रवास खूप विलक्षण होता. या प्रवासात अनेक गोष्टींमधून मी घडलो, शिकलो. आज मी जो कोणी आहे तो या अनुभवांमुळे आहे. अभिनय क्षेत्रात काम करताना मी जे काही शिकलो त्याचा उपयोग मला आय-स्पेशालिस्ट म्हणून काम करताना होतोय. मी तुमच्या डोळ्यांचा सुपरहिरो आहे."

तुम्ही जर मिकीच्या सोशल मीडियावर नजर मारली तर त्याचे विविध फोटो आणि रील व्हिडीओ पाहायला मिळतात. तो त्याच्या कामासंबंधी अनेक रील व्हिडीओ पोस्ट करत असतो. याशिवाय मिकीचे बालपणी क्लिक केलेले हृतिक अन् प्रियंकासोबतचे फोटोही पाहायला मिळतात. 

टॅग्स :हृतिक रोशनक्रिश 4प्रियंका चोप्रा