Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून सिनेमाच्या टीमने शाहिदचे टाळ्या वाजवून केले अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 11:39 IST

पद्मावती चित्रपटाच्या यशानंतर शाहिद कपूर सध्या मुंबईत 'बत्ती गुल मीटर चालू' सिनेमाचे शूटिंग करतो आहे.

पद्मावती चित्रपटाच्या यशानंतर शाहिद कपूर सध्या मुंबईत 'बत्ती गुल मीटर चालू' सिनेमाचे शूटिंग करतो आहे. श्री नारायण सिंग दिग्दर्शित ह्या चित्रपटात शाहिद बरोबर श्रद्धा कपूर आणि यामी गौतमसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. शाहिद कपूर ह्या सिनेमात वकिलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. शाहिद कपूरने कोर्टाच्या रुमपच्या सीनच्या शूटिंग दरम्यान सर्वांचा आश्चर्यकित केले. 

मिळालेल्या माहितीनुसार 'बत्ती गुल' मध्ये एक मोठा सीन आहे. हा सिन शाहिदने केलेल्या 'हैदर' सिनेमातल्या सीनपेक्षा ही मोठा आहे. शाहिदने ब्रेकमध्ये सेटवर हा सीन  पाठ केला आणि दिग्दर्शक श्री नारायण सिंग यांच्यासोबत येऊन शॉट डिस्कस केला. यानंतर शाहिदने साडेतीन मिनिटांचा सीन वनटेकमध्ये पूर्ण केला.  शाहिदने हा सीन वनटेकमध्ये पूर्ण केल्याचे पाहून यामी, श्रद्धासह तिथे उपस्थित असलेल्या सर्व क्रू मेंबर्सने त्याचे टाळ्या वाजून अभिनंदन केले. 

'बत्ती गुल'चे दिग्दर्शक श्री नारायण सिंग हे शाहिदचे कौतुक करत म्हणले की, "आम्ही जरी त्या सीनमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक टाकले तरी तो सीन पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी येईल, आम्ही सर्व तो सीन पाहून सेटवर भावूक झालो होतो, ते पुढे म्हणाले की मी जास्त अभिनेत्यांनबरोबर काम केले नाही पण शाहिद एक उत्तम अभिनेता आहे. तसेच तो एक चांगला मित्र सुद्धा आहे, आम्ही पुन्हा एकत्र लवकरच उत्तर प्रदेशमध्ये भेटणार आहोत.‘बत्ती गुल मीटर चालू’ हा सिनेमा वीज चोरीवर आधारित आहे.  वीज कंपनीच्या पायºया झिजवणाऱ्या सामान्य माणसाची कथा यात दिसणार असल्याचे कळते. शाहिदची पत्नी मीरा कपूर हिला या सिनेमाची कथा भलतीच आवडली होती आणि तिनेच या सिनेमासाठी शाहिदला राजी केल्याचे मानले जाते. यात अभिषेक बच्चनही लहानशा भूमिकेत दिसणार असल्याची खबर आहे.  श्रद्धा यात एका खास पद्धतीच्या एक्सेंटमध्ये बोलताना दिसणार आहे. यावर्षी ३१ आॅगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

टॅग्स :शाहिद कपूरश्रद्धा कपूर