दंगलचा ‘धाकड’ गायक रफ्तार म्हणतो; ‘जेनिफर आपकी भाभी है’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2016 13:35 IST
Raftaar's rap to feature in Hollywood film 'Passengers' ; हॉलिवूड अभिनेता ख्रिस पॅ्रट व अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स यांची मुख्य भूमिका असलेला पॅसेंजर हा चित्रपट लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी रफ्तार सिंगने गाणे गायले आहे.
दंगलचा ‘धाकड’ गायक रफ्तार म्हणतो; ‘जेनिफर आपकी भाभी है’
‘दंगल’ या चित्रपटात आमिर खानच्या अभिनयासह त्याच्या मुलींची भूमिका साकारणाºया चारही अभिनेत्रींच्या कामाची चर्चा होत आहे. ‘दंगल’चा भाग असणारा आणखी एक ा कलाकारची चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटात ‘धाकड है’ हे गाणे गाणारा गायक रफ्तार सिंग याने हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स हिच्याबद्दल ‘जेनिफर आपकी भाभी है’ असे उद्गार काढले आहेत. यामागील कारणही तसेच आहे. धाकड गाण्यामुळे हरयाणवी रॅप सिंगर रफ्तार सिंग याला बॉलिवूडमध्ये नवी ओळख मिळाली आहे. धाकड गाण्याच्या प्रदर्शनानंतर त्याचे लग्न झाले. त्याच्या लग्नाला देखील मीडियाने चांगलीच जागा दिली. त्याला बॉलिवूडमधून अनेक आॅफर येत असल्या तरी त्याची ख्याती साता समुद्रापार पोहचली आहे. गायक रफ्तार लवकरच हॉलिवूड चित्रपटासाठी गाणे गाणार आहे. हॉलिवूड अभिनेता ख्रिस पॅ्रट व अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स यांची मुख्य भूमिका असलेला पॅसेंजर हा चित्रपट लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी रफ्तार सिंगने गाणे गायले आहे. भारतात पॅसेंजरच्या प्रदर्शनापूर्वी त्याचे हे गाणे दाखविले जाणार असून यासंदर्भातील एक करार नुकताच निर्माते व गायक रफ्तार सिंग यांच्यात झाला आहे. या गाण्याच्या करार संदर्भात रफ्तार सिंग म्हणाला, हे गाणे पॅसेंजर या चित्रपटात केकमध्ये साखरे सारखे असेल यामुळे चित्रपटाचे गोडी वाढणार आहे. विशेष म्हणजे ख्रिस प्रॅट हा माझ्या भावासारखा आहे तर जेनिफर लॉरेन्स ही तुमची वहिणी आहे. मला पहिल्या हॉलिवूडपटासाठी गाणे गाण्यासाठी मी उत्साहित आहे. हॉलिवूड निर्माते व भारतीय रॅप गायकांत झालेला हा करार हॉलिवूड चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नवा फंडा ठरणार आहे यात शंकाच नाही.