शोलेच्या या सीनमध्ये दिसला होता ठाकूरचा हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 12:46 IST
शोले या चित्रपटाच्या एका सीनमध्ये प्रेक्षकांना ठाकूरचा हात पाहायला मिळाला होता. हे दृश्य आपल्याला युट्युबला देखील पाहायला मिळते.
शोलेच्या या सीनमध्ये दिसला होता ठाकूरचा हात
शोले हा चित्रपट आजवरच्या सगळ्या बॉलिवूड चित्रपटातील हिट चित्रपट मानला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही आठवड्यात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद प्रेक्षकांना मिळाला नव्हता. पण नंतर माऊथ पब्लिसिटीमुळे या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या चित्रपटांमधील वीरू, जय, बसंती, गब्बर, ठाकूर, सुरमा भोपाली, जेलर, राधा यांसारख्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात आहे. टिव्हीवर हा चित्रपट लागल्यानंतर प्रेक्षक हा चित्रपट आवर्जून पाहातात. या चित्रपटात ठाकूरची व्यक्तिरेखा संजीव कुमार यांनी सााकरली होती. या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. संजीव कुमार यांच्या संवाद फेकीच्या स्टाईलचे सगळ्यांनीच कौतुक झाले होते. या चित्रपटात गब्बर म्हणजेच अमजद खान ठाकूरचे दोन्ही हात कापून टाकतो. त्यामुळे ठाकूरला चित्रपटाच्या नंतरच्या दृश्यात हात नसतात असे आपल्याला पाहायला मिळाले होते.शोले या संपूर्ण चित्रपटात ठाकूरला हात नसल्याने त्याच्या अंगावर सतत शाल असल्याचे आपण पाहिले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, शोलेच्या एका दृश्यात प्रेक्षकांना संजीव कुमारचे हात पाहायला मिळाले होते. शोले हा चित्रपट जर तुम्ही एकदम व्यवस्थितपणे पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, एका दृश्यात ठाकूरचे हात आपल्याला स्पष्ट दिसत आहेत. ही गोष्ट अनेक वर्षांनी काही प्रेक्षकांच्या लक्षात आली आणि त्यांनी युट्युबला हे दृश्य अपलोड देखील केले आहे. या दृश्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच या दृश्यावरून सोशल मीडियावर या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना ट्रोल देखील करण्यात आले होते. शोले या चित्रपटात गब्बर म्हणजेच अमजद खान ज्यावेळी ठाकूरला बोलतो की, ये हाथ मुझे दे दे ठाकूर हा सीन प्रचंड गाजला होता. या सीनमध्ये संजीव कुमार आणि अमजद खान यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. हे दोघेही खूपच चांगले अभिनेते होते. या चित्रपटाच्या एका क्लायमॅक्सच्या दृश्यात ठाकूर गब्बरला लाथेने तुडवतो असे दिसले होते.. या दृश्यात ठाकूरचा हात प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. Also Read : ‘शोले’च्या शूटिंगवेळी चहा मिळाला नसल्याने गब्बर अमजद खानने सेटवर आणल्या होत्या चक्क दोन म्हशी!