शाहरूखमुळे करणच्या डोळ्यात तरळले अश्रू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 21:00 IST
करण जोहर आणि शाहरूख खान यांची मैत्री बॉलिवूडमध्ये फेमस आहे. हे नाते बरेच भावनिक आहे. कदाचित म्हणूनच शाहरूखच्या तोंडून ...
शाहरूखमुळे करणच्या डोळ्यात तरळले अश्रू!
करण जोहर आणि शाहरूख खान यांची मैत्री बॉलिवूडमध्ये फेमस आहे. हे नाते बरेच भावनिक आहे. कदाचित म्हणूनच शाहरूखच्या तोंडून प्रशंसा ऐकून करणचे डोळे अक्षरश: पाणावले. होय, खुद्द करणने एका मुलाखतीत हे सांगितले. शाहरुख खानने करणच्या ‘ए दिल हैं मुश्किल’ या चित्रपटातील गाण्यांची प्रशंसा केली आणि शाहरूखच्या तोंडून स्वत:ची प्रशंसा ऐकून करणचे डोळे पाणावले. शाहरूख माझ्यासाठी खूप महत्त्वाची व्यक्ति आहे. ‘ए दिल हैं मुश्किल’ या माझ्या चित्रपटाबद्दल मी खूप उत्सूक आहे. मी सहज म्हणून याबद्दल शाहरूखला त्याची प्रतिक्रिया विचारली. शाहरूखने अगदी मनापासून प्रतिक्रिया दिली. त्याच्या तोंडून माझी प्रशंसा ऐकून माझे डोळे भरून आले, असे करणने स्वत: सांगितले.‘ए दिल हैं मुश्किल’चा ट्रेलर शाहरूखला आवडला नाही, अशी मध्यंतरी बातमी होती. अर्थात शाहरूखने ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले होते. मी अद्यापही ‘ए दिल हैं मुश्किल’चे ट्रेलर पाहिलेले नाही. केवळ चित्रपटाची गाणी ऐकली आहेत आणि ती प्रशंसा करण्यासारखी आहेत. टायटल ट्रॅक तर अद्धभूत आहे, असे शाहरूख म्हणाला होता. ‘ए दिल हैं मुश्किल’चे शूटींग संपले आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होतो आहे.