Join us

तापसी पन्नू म्हणते, किसींग सीन्स इतकी टीका का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 16:33 IST

‘बेबी’,‘पिंक’,‘नाम शबाना’ यासारख्या चित्रपटांत दमदार अभिनय करणारी अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच ‘जुडवा2’ या चित्रपटात दिसणार आहे. वरूण धवनसोबत ती ...

‘बेबी’,‘पिंक’,‘नाम शबाना’ यासारख्या चित्रपटांत दमदार अभिनय करणारी अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच ‘जुडवा2’ या चित्रपटात दिसणार आहे. वरूण धवनसोबत ती या चित्रपटात दिसणार आहे. तूर्तास या चित्रपटातील तापसी व वरूणचा एक किसींग सीन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या चुंबन दृश्यांवर अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण तापसीने मात्र या चुंबन दृश्यांचा जोरदार बचाव केला आहे. एका मुलाखतीत तिने या चुंबन दृश्यांवर अगदी स्पष्ट भूमिका मांडली.अलीकडे आपण जरा अधिकच संवेदनशील झालेलो आहोत. प्रत्येक गोष्टीत चुका शोधण्याची सवय आपल्याला लागली आहे.  चित्रपटाचा महिमा सांगण्यासाठी किंवा मुलींना पटवण्याचे माध्यम म्हणून आम्ही ही चुंबनदृश्ये चित्रपटात दिलेली नाहीत. ही चुंबने दृश्ये कथेची गरज आहे. माझ्यामते, लोक विनाकारण यावर आक्षेप नोंदवत आहेत, असे तापसी म्हणाली.दोघांचा या अनेक हिट सिनेमे दिल्यानंतरही अद्यापही तापसी स्वत:ला स्ट्रगलिंग अभिनेत्री मानते. मी अद्यापही स्ट्रगलिंग अभिन्ेत्रीच आहे. मी स्टार बनले असे मला एक क्षणही वाटत नाही. ज्या प्रकारचे चित्रपट मला करायचे आहेत, ते मिळवणे सोपे नाही. मला त्यासाठी संघर्ष करावा लागतो. एखादा प्रोजेक्ट आवडला असेल तरी त्याचा निर्माता कोण, दिग्दर्शक कोण अशा सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. अद्यापही मी मोठ्या निर्माता दिग्दर्शकांची पहिली पसंत नाही. ‘जुडवा2’मुळेही फार काही बदलणार नाहीय. कमर्शिअल चित्रपटांची हिरोईन बनण्यासाठी प्रेक्षकांनी तुम्हाला स्वीकारणे सर्वाधिक गरजेचे आहे, असेही तापसी म्हणाली.ALSO READ : बिकिनी फोटोंवरून ट्रोल करणाऱ्यांना तापसी पन्नूचे रोखठोक उत्तर; म्हटले ‘टू पीस घालणे भारतीय संस्कृतीच्या विरोधात कसे?’ १९९७ साली दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्या ‘जुडवा’ या सुपरहिट चित्रपटात सलमान खानने दुहेरी भूमिका केली होती. तब्बल १९ वर्षांनंतर याच चित्रपटाचा सीक्वल पुन्हा तयार करण्यात येत  आहे. ‘जुडवा2’मध्ये वरूण धवन राजा आणि प्रेम अशा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे ‘उंची है बिल्डिंग’ आणि ‘टन टना टन...’ही दोन गाजलेली गाणीही ‘जुडवा2’मध्ये दिसणार आहेत. येत्या शुक्रवारी म्हणजेच दसºयाच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.