Join us

​तापसी पन्नूचा अ‍ॅक्शन अवतार ‘नाम शबाना’चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 20:51 IST

‘नाम शबाना’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. तापसी पन्नूचा अ‍ॅक्शन अवतार या चित्रपटातून पहायला मिळणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिची प्रमुख भूमिका असलेल्या ‘नाम शबाना’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. तापसी पन्नूचा अ‍ॅक्शन अवतार या चित्रपटातून पहायला मिळणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून होत आहे. ‘नाम शबाना’ हा बेबीचा प्रिक्वल मानला जात असून ट्रेलरमध्ये तापसी पन्नूसोबतच अक्षय कुमार, अनुपम खेर, मनोज वाजपेयी व डॅनी डेंजोग्पा दिसत आहे. यापूर्वी या चित्रपटाचे दोन पोस्टर रिलीज करण्यात आले होते. बेबी या चित्रपटात तापसी पन्नूने शबाना ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेची चांगलीच प्रशंसा झाली होती. तब्बल दोन वर्षांनंतर शबानावर चित्रपटाची निर्मिती करण्याचे धाडस निर्मात्यांनी दाखविले असून हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. निर्माता दिग्दर्शक नीरज पांडे दिग्दर्शित ‘नाम शबाना’चा ट्रेलर रिलीज करताना लिहले. शबाना मला एक वाक्याची आठवण करून देते ‘एक महिला केवळ त्याच वेळ कमजोर असते जेव्हा तिची नेलपॉलिश ओली असेल’ नाम शबानाचा पोस्टर शेअर करीत आहे. या चित्रपटासाठी तापसी पन्नूच्या शबाना कै फने मिक्स्ड मार्शल आर्ट कुडो आणि क्रव मागामध्ये प्रशिक्षण घेतले आहे. लवकर तुम्ही हे पाहाल. तापसी पन्नूची भूमिका असलेला नाम शबाना हा चित्रपट 31 मार्चला रिलीज होत होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून यात अनेक गुढ रहस्ये असावी व त्याच तोडीचे अ‍ॅक्शन असले असे दिसते. या चित्रपटात लव्ह अँगलही असल्याचे ट्रेलरमध्ये दिसते. बेबीच्या पूर्वीची शबानाची स्टोरी अशी कॅच लाईन देण्यात आली आहे. ज्या लोकांना ‘नाम शबाना’ची स्टोरी लाईन माहित आहे. त्यांच्या मते पूर्वाश्रमीची रॉ एजेंट स्वत:ला शबाना नावाच्या चरित्राशी जोडू शकतील. अभिनेत्री तापसी पन्नू या चित्रपटात शबानाची भूमिका साकारत आहे. ‘नाम शबाना’ तापसी पन्नूच्या बेबी मधील भूमिको स्पिन आॅफ आहे. असा प्रयोग भारतीय चित्रपटात पहिल्यांदाच केला जात आहे असे निर्माता नीरज पांडे यांनी सांगितले आहे.