Join us
Daily Top 2Weekly Top 5

तनुश्री-राखी नवा वाद सुरू; राखीने पुन्हा धरले धारेवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 18:51 IST

कलाविश्वात सुरु असलेल्या या आरोप-प्रत्यारोपामध्ये राखीने नानांची बाजू घेत तनुश्रीवर टाकास्त्र सोडले होते. त्यानंतर तनुश्री-राखी हा नवा वाद सुरू झाला. मात्र आता तनुश्री अमेरिकेला परतल्याने राखी सावंतने पुन्हा एकदा तिला धारेवर धरले आहे. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत.

अभिनेत्री तनुश्रीने दत्ता आणि ड्रामा क्वीन राखी सावंत हे कायमच एकमेकांवर आगपाखड करत असतात. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर कलाविश्वामध्ये एकच खळबळ माजली होती. या वादामध्ये कलाविश्वातील अनेकांनी त्यांची मत मांडली होती. त्यात ड्रामा क्वीन अर्थात राखी सांवतनेही तिचं मत मांडलं होतं. कलाविश्वात सुरु असलेल्या या आरोप-प्रत्यारोपामध्ये राखीने नानांची बाजू घेत तनुश्रीवर टाकास्त्र सोडले होते. त्यानंतर तनुश्री-राखी हा नवा वाद सुरू झाला. मात्र आता तनुश्री अमेरिकेला परतल्याने राखी सावंतने पुन्हा एकदा तिला धारेवर धरले आहे. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत.

राखीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून यात तिने तनुश्रीच्या अमेरिकेत जाण्यामागचं कारण सांगितलं आहे. तसंच केवळ प्रसिद्धीसाठी आणि व्हिसा मिळावा यासाठीच तिने हे नाटक केल्याचंही म्हटलं आहे. तनुश्री अमेरिकेला का गेली याच्या मागचं कारण मला आता उलगडं आहे. तिला प्रसिद्धी हवी होती. इतकंच नाही तर व्हिसा लवकरात लवकर मिळावा यासाठीच तिचे हे प्रयत्न होते. मात्र या  सगळया खटाटोपामध्ये तिने अनेकांवर आरोप केले, असं राखी म्हणाली.

दरम्यान, राखीने केलेल्या या वक्तव्यामुळे राखी-तनुश्री वादाला नवं वळण मिळालं आहे. मात्र राखीच्या या वक्तव्यावर तनुश्रीने कोणतंही उत्तर दिलेलं नाही. न्यु जर्सीला परतण्यापूर्वी तनुश्रीने झालेल्या एका मुलाखतीमध्ये मोहिमेविषयी तिचं मत मांडलं होतं. ‘मला कधी ना कधी तरी न्याय नक्कीच मिळेल. मात्र, माझ्यामुळे अन्य महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे,’ असं तनुश्री म्हणाली होती.

टॅग्स :तनुश्री दत्ताराखी सावंतनाना पाटेकर