Join us
Daily Top 2Weekly Top 5

#MeToo वादळानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार का तनुश्री दत्ता?, बहिणीने दिलं 'हे' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 10:15 IST

तनुश्री दत्ता गेल्या अनेक वर्षांपासून सिनेमांपासून दूर आहे. काही वर्षांपूर्वी ती बॉलिवूडला रामराम करुन अमेरिकेत स्थायिक झाली.

ठळक मुद्देतनुश्रीने २००५ साली आशिक बनाया आपने सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलेतनुश्री अमेरिकेत परतली आणि शांतते आपलं आयुष्य जगतेय

तनुश्री दत्ता गेल्या अनेक वर्षांपासून सिनेमांपासून दूर आहे. काही वर्षांपूर्वी ती बॉलिवूडला रामराम करुन अमेरिकेत स्थायिक झाली. जेव्हा ती भारतात परतली तेव्हा तिने मीटू मोहिमेला सुरुवात केली. तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप लावत संपूर्ण देशात खळबळ उडवली होती. यानंतर सगळीकडे तनुश्रीची चर्चा होऊ लागली.

त्यानंतर अनेकांनी ती रिअ‍ॅलिटीशोमध्ये किंवा सिनेमामध्ये दिसू शकते असा अंदाज लावला होता.  मात्र यासगळ्या चर्चा फोल ठरल्या कारण यासगळ्या प्रकरणानंतर तनुश्री अमेरिकेत परतली आणि शांतते आपलं आयुष्य जगतेय. 

तनुश्रीची बहीण इशिता दत्ता सनी देओल आणि ट्विंकल खन्नासोबत 'ब्लॅक' सिनेमात दिसणार आहे. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान बोलताना इशिता म्हणाली, माझी इच्छा आहे तनुश्री बॉलिवूडमध्ये कमबॅक करावं. मात्र हि तिची पर्सनल चॉईस असणार आहे. पुढे तिला विचारण्यात आले तनुश्री सध्या कोणत्या प्रोजेक्टवर काम करतेय का?, यावर ती म्हणाली, सध्या तरी ती कोणत्याच प्रोजेक्टचा भाग नाहीय आणि जर भविष्यात तिला जर एखाद्या प्रोजेक्टचा भाग बनायचं असेल तर ती ज्या गोष्टीवर विश्वास ठेवले ती त्याच्याच भाग बनेल.  

तनुश्रीने २००३ साली फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर २००५ साली आशिक बनाया आपने सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. या सिनेमाला आणि तनुश्रीच्या सिनेमातील परफॉर्मन्सला रसिकांची दाद मिळाली. यानंतर ती चॉकलेट, ढोल, रिस्क,स्पीड अशा विविध सिनेमातही झळकली. 2010 साली रूपेरी पडद्यावर झळकलेल्या अपार्टमेंट सिनेमात तनुश्री शेवटची दिसली होती.  

टॅग्स :तनुश्री दत्तामीटू