Join us

गंभीर शारीरिक व्याधीमुळे लोकप्रिय अभिनेत्री त्रस्त; चालताना घ्यावा लागतोय काठीचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 15:17 IST

Tannaz irani: गेल्या २ वर्षांपासून ही अभिनेत्री या गंभीर समस्येमुळे त्रस्त आहे.

कलाविश्वात आज असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. परंतु, आज हेच कलाकार रुपेरी पडद्यावर यशस्वी सेलिब्रिटी म्हणून ओळखले जात आहेत. विशेष म्हणजे यात असेही काही कलाकार आहेत जे सिनेमासह मालिकांमध्येही काम करतायेत. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे तनाज इराणी (tannaz irani).  छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या तनाज लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक गाजलेले सिनेमा आणि मालिका करणारी तनाज गेल्या २ वर्षांपासून एक मोठ्या आजारासोबत लढा देत आहे.

५१ वर्षाची तनाज एका शारीरिक व्याधीने त्रस्त असून सध्या तिला काठीच्या आधाराने चालावं लागत आहे. अलिकडेच तनाजने तिच्या या आजारपणाविषयी भाष्य केलं. 'टाइम्स ऑफ इंडिया'नुसार, गेल्या २ वर्षांपासून तनाज पाठीच्या दुखापतीमुळे एका मोठ्या आजाराचा सामना करत आहे. ज्यामुळे तिला चालतानाही प्रचंड वेदना जाणवतात. म्हणूनच, तिला काठीच्या सहाय्याने चालावं लागत आहे. इतकंच नाही तर येत्या काळात तिची एक शस्त्रक्रियाही करावी लागणार आहे.

"माझ्या या आजारावर गेल्या २ वर्षांपासून उपचार सुरु आहेत.  पाठ आणि गुडघे यांच्याशी निगडीत ही समस्या असून मी कित्येक एमआरआय आणि एक्स रे काढले, अनेक डॉक्टरांना भेटले. या सगळ्यात मला डॉक्टरानी हिप रिप्लेसमेंट सर्जरी करण्याचा सल्ला दिला आहे. येत्या काही काळात ही सर्जरी पार पडणार आहे," असं तनाज म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मी घाबरले नाहीये. पण, उत्सुकता खूप आहे. मी कायम सकारात्मक विचार करणारी महिला आहे. त्यामुळे मी सर्जरीसाठी तयार आहे. मी लवकरच पहिलेसारखी पूर्णपणे बरी होऊन परत येईन. माझ्या मुलीने माझा लंडनमधील एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात मी हातात शॉपिंग बॅग घेऊन धावत होते. हा व्हिडीओ शेअर करत तिने म्हटलंय, हा तेव्हाचा व्हिडीओ आहे जेव्हा आई धावू शकत होती, चालू शकत होती. हा व्हिडीओ पाहिल्यावर मला माझे अश्रू अनावर झाले. कारण, तेव्हापासून त्यांनी मला घरात फक्त लंगडत चालताना पाहिलं आहे." 

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीटेलिव्हिजनआरोग्य