Join us

तन्मयची चूक गंभीर: ओम पुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 18:25 IST

अभिनेता ओम पुरी यांनी तन्मय भट्टच्या वादग्रस्त व्हिडिओबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. तन्मयने केलेल्या कृत्यानंतर तो मोकळा कसा फिरु ...

अभिनेता ओम पुरी यांनी तन्मय भट्टच्या वादग्रस्त व्हिडिओबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. तन्मयने केलेल्या कृत्यानंतर तो मोकळा कसा फिरु शकतो. त्याने देशाच्या दोन आदरणीय आणि प्रेमळ व्यक्तींचा अपमान केला आहे. लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांना सारे जग ओळखते. केवळ भारतातच नव्हे तर जगभर त्यांचे फॅन्स आहेत. भारत आणि इतर देशातही या दोघांना मान आहे. काही किरकोळ कारणासाठी तुम्ही त्यांचा अपमान करु शकत नसल्याचे ओम पुरी म्हणाले.त्यांना जरी भारतरत्न मिळाला नसता, तरी ते देशासमोरील आदर्श आहेत. आपण किती लोकशाहीवादी आहोत, हे दाखविण्यासाठी तुम्ही त्यांची चेष्टा करु शकत नसल्याचेही ओम पुरी यांनी सांगितले.