Join us

​ तन्मय भट्टने केले असे काही की प्रियंका भडकली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 21:17 IST

‘एआयबी’ या वादग्रस्त मालिकेतून स्नॅप चॅट व्हिडिओद्वारा भारतरत्न लता मंगेशकर व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची टिंगल उडवणारा तन्मय ...

‘एआयबी’ या वादग्रस्त मालिकेतून स्नॅप चॅट व्हिडिओद्वारा भारतरत्न लता मंगेशकर व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची टिंगल उडवणारा तन्मय भट्ट याने यावेळी बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा हिला लक्ष्य केले. प्रियंकाचे नाव जेव्हाकेव्हा माझ्या डोक्यात येते, तेव्हा माझा मेंदू आपोआप  ‘प्रिययययंका चोपू्रह’ असा उच्चार करायला लावतो, असे तन्मयने म्हटले. तन्मयच्या या टिंगलटवाळकीने प्रियंकाचे भडकणे साहजिक होते. ती जाम भडकली आणि तिने तन्मयला त्याच्याच भाषेत सुनावले. ‘मेरे अंदर तो एक्सेंट होना ही चाहिए तन्मय, पर तुम्हे क्या हुआ Lol’’ अशा शब्दांत तिने तन्मयला फटकारले.तन्मय आणि वादांचे जुने नाते आहे. शोमधून अनेकांची टिंगल उडवल्याने तो अनेकदा अडचणीतही सापडला आहे. शोचे गेस्ट व बॉलिवूडच्या काही सेलिब्रटीजविरुद्ध मुंबई व पुण्यात अनेक खटलेही दाखल आहेत.}}}}}}}}