Join us

​अजय देवगण साकारणार तानाजी मालुसरे ; फर्स्ट लूक जारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2017 10:24 IST

‘शिवाय’मध्ये धम्माल करणारा अजय देवगण पुन्हा एकदा आपल्या जुन्या अ‍ॅक्शन अंदाजात दिसणार आहे. होय, अजय पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये आला ...

‘शिवाय’मध्ये धम्माल करणारा अजय देवगण पुन्हा एकदा आपल्या जुन्या अ‍ॅक्शन अंदाजात दिसणार आहे. होय, अजय पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये आला आहे. लवकरच अजय एका ऐतिहासिक चित्रपटात दिसेल. या चित्रपटाचे नाव आहे, ‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’. या चित्रपटाचा फर्स्ट लूक अजयने आज जारी केला.  अजय यात तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. होय, ‘गड आला पण सिंह गेला,’ असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या आठवणीने हळहळते त्याच तानाजी मालुसरे यांचा ऐतिहासिक पराक्रम आपण पडद्यावर पाहू शकणार होता. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात अजय मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  कोंढाणा जिंकूण आणण्यासाठी तानाजींनी प्राणांची बाजी लावली होती. तानाजी हे बारा हजार हशमांचे (पायदळ) सुभेदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या काही सहकाºयांनीदेखील शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य मिळवण्यासाठी लढण्याची शपथ घेतली होती. तानाजी हे शिवाजी महाराजांच्या या मौल्यवान सहकाºयांपैकी एक होते.ALSO READ : नवा रंग, नवा साज...‘बादशाहो’चे ‘मेरे रश्के कमर...’ गाणे रिलीज!!अजयला तानाजीच्या भूमिकेत पाहणे, चाहत्यांसाठी कुठल्या भेटीपेक्षा कमी नसणार आहे. यात अजय एकदम वेगळ्या अवतारात दिसेल. अजय दीर्घकाळापासून या प्रोजेक्टवर काम करत होता. स्वत: अजय या चित्रपटाबद्दल कमालीचा उत्सूक आहे. ‘तानाजी: द अनसंग वॉरिअर’चे पोस्टर शेअर करताना त्याची ही उत्सुकता स्पष्टपणे दिसली. अजयइतकेच तुम्हीही या चित्रपटाबद्दल उत्सुक असालच. तुम्ही  किती उत्सुक आहात, ते   खालील कमेंटबॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. या चित्रपटाशिवाय अजय सध्या रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल4’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच रिलीज होतो आहे.