Join us
Daily Top 2Weekly Top 5

​तामिळनाडूच्या अनुकृती वासने जिंकला ‘फेमिना मिस इंडिया2018’चा ताज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 09:56 IST

तामिळनाडूची अनुकृती वास या सुंदरीने यंदाचा ‘फेमिना मिस इंडिया2018’चा किताब आपल्या नावावर केला. मंगळवारी रात्री उशीरा या सौंदर्य स्पर्धेचा ...

तामिळनाडूची अनुकृती वास या सुंदरीने यंदाचा ‘फेमिना मिस इंडिया2018’चा किताब आपल्या नावावर केला. मंगळवारी रात्री उशीरा या सौंदर्य स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. यावेळी अनुकृतीने बाजी मारली. हरियाणाची मिनाक्षी चौधरी ही दुस-या तर आंध्र प्रदेशची श्रेया राव ही तिस-या स्थानी राहिली.मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोम येथे ही भव्यदिव्य स्पर्धा पडली. करण जोहर व आयुष्यमान खुराणा यांचे बहारदार सूत्रसंचालन, बॉलिवूड सेलिब्रिटींची उपस्थिती आणि सौंदर्य यामुळे आणखीच ग्लॅमरस झालेल्या या सौंदर्य स्पर्धेचा निकाल जाहीर करण्याचा क्षण आला आणि सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली.  कारण भारतातील विविध राज्यांतून आलेल्या ३० सौंदर्यवतींमध्ये जोरदार चुरस होती. दुस-या फेरीत ३० मधून १२ स्पर्धकांची निवड करण्यात आली. अंतिम फेरीत पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली.या पाच स्पर्धकांमधूल अखेरच्या क्षणी १९ वर्षांच्या अनुकृती वास हिच्या नावाची घोषणा झाली आणि सगळीकडेचं जल्लोष झाला. गतवर्षीची मिस इंडिया मानुषी छिल्लर हिने अनुकृतीच्या शिरावर ‘मिस इंडिया’चा मुकूट चढवला. मानुषी छिल्लर, के एल राहुल, इरफान पठाण, बॉबी देओल, कुणाल कपूर, मलायका अरोरा खान, बॉलीवूडमधील ख्यातनाम फॅशन डिझायनर गौरव गुप्ता आणि महिला पत्रकार डिसूझा यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी करिना कपूर, माधुरी दीक्षित, जॅकलिन फर्नांडिस यांचा परफॉर्मन्सही डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.अनुकृती वास ही पेशाने खेळाडू आणि नृत्यांगणा आहे. बाईक चालवणे हा तिचा छंद आहे़ भविष्यात सुपरमॉडेल बनण्याचा तिचा इरादा आहे.तत्पूर्वी फेमिना मिस इंडिया 2018 च्या रेड कार्पेटवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपला जलवा दाखवला. नेहा धूपिया, रकुल प्रीत, मलायका अरोरा, आदींनी रेड कार्पेटची शान वाढवली.