पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत शॉपिंग करताना दिसली तमन्ना भाटिया; लग्नाची तयारी तर नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 11:50 IST
‘बाहुबली’ अभिनेता प्रभास याच्या लग्नाच्या ब-याच चर्चा झाल्या. अर्थात या सगळ्या चर्चाच ठरल्या. कारण प्रभास यंदा तरी लग्नाच्या मूडमध्ये ...
पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत शॉपिंग करताना दिसली तमन्ना भाटिया; लग्नाची तयारी तर नाही?
‘बाहुबली’ अभिनेता प्रभास याच्या लग्नाच्या ब-याच चर्चा झाल्या. अर्थात या सगळ्या चर्चाच ठरल्या. कारण प्रभास यंदा तरी लग्नाच्या मूडमध्ये दिसत नाहीय. पण कदाचित त्याची हिरोईन अर्थात ‘बाहुबली’ फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला मात्र यंदा कर्तव्य उरकायची घाई झालेली दिसतेय. होय, चर्चा तर अशीच आहे. तमन्ना लग्न करणार, अशी खमंग बातमी आहे. कुणासोबत? तर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाक याच्यासोबत. आश्चर्य वाटले ना? होय, अब्दुल रझाकसोबत तमन्ना शॉपिंग करताना दिसली. तमन्नाचा व अब्दुल रझाकचा दागिण्यांचे शॉपिंग करत असतानाचा एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. मग काय? या तमन्ना लग्नाची शॉपिंग करतेय, अशी चर्चा सुरु झाली. या फोटो तमन्ना व अब्दुल रझाक दुबईतील एका ज्वेलरी शॉपमध्ये उभे आहेत. यात दोघेही ज्वेलरी खरेदी करताना दिसताहेत. आता दागिण्यांची खरेदी आणि ती सुद्धा एकत्र म्हटल्यावर ही नक्कीच लग्नाची खरेदी असणार, असेच सगळ्यांना वाटणार ना? तूर्तास तमन्ना व रझाकच्या लग्नाच्या बातमीने क्रिकेट फिल्डवरही खळबळ माजली आहे. कारण रझाक हा विवाहित आहे. ALSO READ : ‘बाहुबली2’च्या प्रत्येक विक्रमासोबत भंगले तमन्ना भाटियाचे स्वप्न!! खरे तर, दोघे लग्न करणार, अशी चर्चा असताना त्यांचा शॉपिंगचा हा फोटो २०१३ सालातील असल्याचेही म्हटले जातेय. दुबईतील एका ज्वेलरी शॉपच्या उदघाटनाचा हा फोटो असल्याचेही म्हटले गेलेय. त्यामुळे काय खरे नि काय खोटे, हे आम्हाला ठाऊक नाही. आता तमन्ना वा रझाक या दोघांनीच हा गुंता सोडवलेला बरा. कारण शेवटी चर्चा थांबवायच्या म्हटल्यावर त्यावर खुलासा करणे आलेच ना!