Join us
Daily Top 2Weekly Top 5

कास्टिंग काउचविषयी बोलताच टीकेची धनी ठरली ‘ही’ अभिनेत्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 17:05 IST

‘अय्यारी’ अभिनेत्री रकुल प्रित सिंग सध्या चांगलीच वादाच्या भोवºयात सापडली आहे. रकुलने कास्टिंग काउचबद्दल एक वक्तव्य केले होते. मात्र ...

‘अय्यारी’ अभिनेत्री रकुल प्रित सिंग सध्या चांगलीच वादाच्या भोवºयात सापडली आहे. रकुलने कास्टिंग काउचबद्दल एक वक्तव्य केले होते. मात्र तिच्या या वक्तव्यामुळे तेलगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली असून, अनेकांनी तिच्यावर खरपूस टीका केली आहे. त्याचे झाले असे की, रकुलने आपल्या वक्तव्यात म्हटले होते की, तेलगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउचसारखे प्रकार होत नाहीत. मात्र रकुलचे हे वक्तव्य तेलगू अभिनेत्री श्रीरेड्डी आणि माधवी लता यांना अजिबातच पटले नाही. त्यांनी तिला खोटारडी म्हणतानाच तिच्यावर टीका केली. माधवी लताने म्हटले की, रकुल खोटं बोलत आहे. इंडिया ग्लिट्सने दिलेल्या माहितीनुसार, या अभिनेत्रींनी म्हटले की, रकुलच्या या अनपेक्षित वक्तव्यामागे तिचा काहीतरी स्वार्थ दडलेला आहे. तिला भीती वाटत आहे की, कास्टिंग काउचसारख्या गंभीर मुद्द्यावर विरोधात्मक बोलून इंडस्ट्रीत मिळणाºया भूमिकांपासून दुरावलो जाऊ नये. माधवीने म्हटले की, वास्तविक रकुलने याविषयी नव्या अभिनेत्रींमध्ये जागरूकता निर्माण करायला हवी. तिने अशाप्रकारे खोटं बोलू नये. रकुलच्या या वक्तव्याचा दोन्ही अभिनेत्रींनी समाचार घेताना म्हटले की, टॉलीवूडमध्ये असेच लोक कास्टिंग काउचला कारणीभूत ठरत आहे. रकुलला खरं बोलून सत्याच्या बाजूने उभे राहायला हवे. तिने असे कृत्य करणाºया निर्मात्यांचा पर्दाफाश करायला हवा. साउथ इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध नाव असलेल्या रकुलचा जन्म १० आॅक्टोबर १९९० मध्ये दिल्लीतील एका पंजाबी परिवारात झाला. २००९ मध्ये ‘गिल्ली’ या कन्नड चित्रपटातून तिने आपल्या अभिनयास सुरुवात केली. रकुलला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक २०१४ मध्ये आलेल्या ‘यारियां’ या चित्रपटातून मिळाला. नुकतीच ती सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज बाजपेयी स्टारर ‘अय्यारी’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती.