Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना घेतेय तलावरबाजीचे प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2017 13:27 IST

बॉलिवूडची क्वीन अर्थात कंगना रणौत सध्या मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटाताला घेऊन सीरियस झाली आहे. नुकतीच ...

बॉलिवूडची क्वीन अर्थात कंगना रणौत सध्या मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटाताला घेऊन सीरियस झाली आहे. नुकतीच कंगना लंडनवरुन परतली आहे आणि मुंबईत परताच तिने तिच्या भूमिकेच्या तयारीला सुरुवात केली आहे. कंगना घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेण्यास आधीचे सुरुवात केली आहे आता ती तलावरबाजीचे प्रशिक्षण घेते आहे. हे प्रशिक्षण ती दुसरे तिसरे कोणाकडून घेत नसून खुद्द हॉलिवूडचा अॅवॉर्ड विनिंग स्टंट डायरेक्टर निक पॉवेलकडून घेतेय. जो ब्रेवहॉर्ट,   'द बॉर्न आइडेंटिटी', 'रेज़िडेंट ईविल : रिट्रीब्यूशन', 'द थ्री मस्कटियर्स' आणि  'द लास्ट सैमुराय' सारख्या  प्रसिद्ध अॅक्शन चित्रपट काम केले आहे. कंगना विकेंडला निक पॉवेल तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतेय. निक एक आठवड्या आधी  अमेरिकेहुन भारतात आला असल्याचे कंगनाने सांगितले आहे. त्यावेळी कंगना लंडनमध्ये होती. त्यामुळे दिग्दर्शकने चित्रपटातील युद्धतेली सीन्सची कोरिऑग्राफी सुरु केली आहे. लेखक केवी विजयेंद्र प्रसाद यांनी चित्रपटातील अॅक्शन सीन्स खूप बारकाईने लिहिण्यात आले आहेत. निकने तलवारबाजी आणि हाताने केल्या जाणाऱ्या लढाईचे बेसिक ट्रेनिंग सुरु केले आहे. या आठवड्यापासून आम्ही आमचे प्रशिक्षण सुरु करणार आहोत कारण हा अॅक्शन चित्रपट आहे. कंगना रोज 2 तास निककडून प्रशिक्षण घेते आहे. कंगना हे प्रशिक्षण घेताना थक्कतेय जरुर मात्र तरीही ती हे प्रशिक्षण एन्जॉय करतेय.