Join us

OMG! विकी डोनर या चित्रपटाच्यावेळी आला होता आयुषमान खुराणा आणि त्याची पत्नी ताहिरामध्ये दुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 16:55 IST

आयुषमानचे लग्न ताहिरा कश्यपसोबत झाले असून ते दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना खूपच चांगल्या प्रकारे ओळखतात.

ठळक मुद्देआयुषमानने ऑन स्क्रीन किस करणे मला पटलेले नव्हते. मला या गोष्टीचा प्रचंड त्रास होत होता. आम्ही तेव्हा दोघेही खूपच तरुण होतो. त्याला माझ्यासाठी वेळ नव्हता आणि ती गोष्ट समजून घेण्याची माझ्यात ताकद नव्हती. आमच्या नात्यात चांगलाच दुरावा आला होता...

विकी डोनर या पहिल्याच चित्रपटामुळे आयुषमान खुराणाला स्टार बनवले. त्याच्या पहिल्या चित्रपटाचा विषय खूपच वेगळा होता. हा विषय प्रेक्षकांना चांगलाच भावला. पण त्याचसोबत या चित्रपटातील आयुषमानच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले. आयुषमानला त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी अनेक पुरस्कार मिळाले. विकी डोनरसाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या पुरस्कारासोबतच त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पण (गायक) हा पुरस्कार देखील मिळाला. या चित्रपटानंतर आयुषमान त्याच्या करियरमध्ये यश मिळवत होता तर दुसरीकडे त्याच्या खाजगी आयुष्यात सर्व काही आलबेल नव्हते. 

आयुषमानचे लग्न ताहिरा कश्यपसोबत झाले असून ते दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना खूपच चांगल्या प्रकारे ओळखतात. आयुषमानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्याच्याआधीच त्याचे लग्न ताहिरासोबत झाले होते. पण या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आयुषमान आणि ताहिरा यांच्या नात्यात दुरावा आला होता असे ताहिरानेच स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. तिने या मुलाखतीत म्हटले आहे की, आयुषमानने ऑन स्क्रीन किस करणे मला पटलेले नव्हते. मला या गोष्टीचा प्रचंड त्रास होत होता. तुम्ही गरोदर असताना तुमच्या हार्मोन्समध्ये बदल घडत असतात. एक मुलगा खूप छान दिसत आहे आणि तो एका महिलेसोबत रोमान्स करत आहे हेच मला पटत नव्हते. आम्ही तेव्हा दोघेही खूपच तरुण होतो. त्याला माझ्यासाठी वेळ नव्हता आणि ती गोष्ट समजून घेण्याची माझ्यात ताकद नव्हती. आमच्या नात्यात चांगलाच दुरावा आला होता... आम्ही एकमेकांच्या सोबतच नाही आहोत असे वाटत होते. तो मला फसवत नाहीये याची मला चांगलीच कल्पना होती. पण हे काय सुरू आहे हे मला कळत नव्हते. मी या सगळ्यात अनेकवेळा हार पत्करली होती. पण त्याने हार मानली नव्हती. मात्र तो सुधारत देखील नव्हता. पण आता आमच्या नात्यात चांगलीच परिपक्वता आली आहे. 

ताहिराला काही महिन्यांपूर्वी कॅन्सर झाला होता. पण तिने या आजाराशी अगदी खंबीरपणे झुंज दिली. यावेळी आयुषमान सतत तिच्यासोबत होता.

आयुष्यमानने २०११ मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी ११ वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत होते. ताहिरा १६ वर्षांची होती, तेव्हा दोघांची भेट झाली होती. ताहिराच्या वडिलांना आयुष्यमान खूप आवडायचा. हा मुलगा तुला खूप आनंदी ठेवेन, असे ते आपल्या मुलीला म्हणाले होते. या कपलला एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. 

टॅग्स :आयुषमान खुराणा